सामाजिक
पिंपरी चिंचवड पुणे काळेवाडी येथे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न

पिंपरी चिंचवड ( अशोक शिवशरण )पिंपरी चिंचवड पुणे काळेवाडी येथील ज्योतिबा मंगल कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर आयोजित कार्यकर्ता संवाद मेळावा ओबीसी मुस्लिम भटके विमुक्त दलित आदिवासी राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी लढा उभा करणारे प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे राजकीय लढ्यात सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर च्या वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजन करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापिका अंजलीताई प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहुन सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख उपस्थिती वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय सचिव एडवोकेट प्रियदर्शन तेलंग , वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर अनिल जाधव , वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट सर्वजीत बनसोडे ,वंचित बहुजन आघाडी महिला सचिव अनिता साळवे आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले .या कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडी शहर कार्यकारणी व महिला आघाडी युवक आघाडी अल्पसंख्यांक आघाडी , माथाडी कामगार आघाडी सर्व शहरातील शाखाचे कार्यकारणी सदस्य , भारतीय बौद्ध महासभा पिंपरी चिंचवड शहर कार्यकारणी भारतीय बौद्ध महासभा पिंपरी चिंचवड जिल्हा शहर महिला आघाडी माता रमाई स्मारक व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते .वंचित बहुजन आघाडी पुणे शहराध्यक्ष अरविंद तायडे वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर महासचिव संजीवन कांबळे , उपाध्यक्ष दीपक भालेराव ,सनी गायकवाड , सोनू शेळके , राजेंद्र साळवे , कचरू दादा ओव्हाळ , अशोक कदम , धनंजय कांबळे , बाबासाहेब शिवशरण, विजय ओव्हाळ , विकी तामचीकर ,संतोष जोगदंड ,संतोष ठोंबे , बापूसाहेब गायकवाड , विनोद गायकवाड यल्लेश शिवशरण ,दशरथ शिंदे राहुल बनसोडे सतीश गायकवाड प्रमोद शिरसागर विजय गेडाम इंद्रसेन गोरे विशाल धुळे ,शिवाजी खडसे , जितेंद्र मोठे , प्रशांत नाटेकर ,मच्छिंद्र कदम, कुमार गावंडे , पत्रकार अशोक शिवशरण , वंचित बहुजन पिंपरी चिंचवड शहर महिला उपाध्यक्ष मंदाकिनी गायकवाड ,कुसुम गवळी शामा जाधव , सविता डोंगरे , समता सैनिक मनोज गरबडे सर्व समता सैनिक महिला व पुरुष व तसेच भारतीय बौद्ध महासभा पिंपरी चिंचवड जिल्हा शहर अध्यक्ष रमाकांत कांबळे , सरचिटणीस डी व्हि सुरवसे , कोषाध्यक्ष रामचंद्र आचलकर कार्यालयीन सचिव अशोक यादव , महिला अध्यक्ष मंदा गजरे, भारती गवळी , सुजाता नवघरे आदींसह पिंपरी चिंचवड मधील वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन संजीवनी कांबळे यांनी केली तर सनी गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.



