सोलापूर
सोलापूर काँग्रेस पक्ष शहर उपाध्यक्ष भीमराव शिंदे यांच्या हस्ते श्री संत गजानन महाराज पालखीतील वारकऱ्यानां अल्पोपहार वाटप

सोलापूर ( रमेश सुरवसे )प्रभाग क्रमांक १ प्रभाकर वस्ती येथे सोलापूर शहर काँग्रेस कमिटी च्या वतीने व काँग्रेस पक्षाचे नेते चेतन नरोटे यांचे अध्यक्ष खाली अशोक कलशेट्टी शहर उपाध्यक्ष भीमराव शिंदे यांच्या हस्ते
श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा सोलापूर येथे आले असता पालखी सोहळ्यात आलेल्या सर्व वारकरी भक्तांना अल्पोपहार व पाणी बॉटल वाटप करण्यात आले. त्यावेळी संतू कांबळे , आकाश वाघमारे , सचिन सुरवसे ,प्रदीप कांबळे , भैय्या शिंदे , दिनेश वाघमारे , बंड्या कसबे , मयूर गायकवाड , राहुल वाघमारे ,किरण कांबळे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होते.