सोलापूर

प्रशांत गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने गजानन महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविकांना केळी वाटप…

 

सोलापूर – ( रमेश सुरवसे )
देवशयानी आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र शेगांव येथील श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे शनिवारी सोलापूर जिल्ह्यात दक्षिण तालुक्यातील उळे येथे आगमन झाले. यावेळी संत गजानन महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविकांना प्रशांत गायकवाड मित्रपरिवाराच्या वतीने ५ हजार केळी वाटप करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते शहाजी भाऊ पवार, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, तहसीलदार किरण जमदाडे, समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे मॅडम यांच्या हस्ते प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य धनेश अचलारे, गंगेवाडीचे सरपंच प्रशांत जाधव, कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर, उळे गावचे उप सरपंच नेताजी खंडागळे, सिध्देश्वर हैले, बाळासाहेब क्षीरसागर, आबासाहेब भोसले, महमंद पठाण, ज्ञानेश्वर डांगे, राहुल ढोकळे, इरफान शेख, विजय कळसे, ज्ञानेश्वर शिंदे, हणमंत सोनटक्के, बिल्ला शिंदे, आयोजक प्रशांत गायकवाड आदींसह मित्र परिवार उपस्थिती होता.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button