सोलापूर
जन्मेजयराजे भोसले यानां जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकाराच्यां वतीने सत्कार

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने बालाजी सरोवऱ येथे सोमवारी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांचा केद्रीय विमान वाहतुक उड्डानमंत्री मुरलीधर मोहोळ व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. याबद्दल अक्कलकोट तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांचा सत्कार करण्यात आला .
याप्रसंगी पत्रकार नंदकुमार जगदाळे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ राज्य कार्यकारणी सदस्य स्वामीराव गायकवाड डिजिटल मिडीया सोलापुर लोकसभा अध्यक्ष राजेशकुमार जगताप पत्रकार रमेश भंडारी पत्रकार प्रशांत भगरे, सोमशेखर जमशेट्टी , श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे सचिव शामराव मोरे , उपाध्यक्ष अभय खोबरे , भाऊ कापसे , लाला राठोड , बाळासाहेब कुलकर्णी देसाई , प्रशांत साठे ,ज्ञानेश्वर भोसले मैनोद्दीन कोरबु ,शिवराज स्वामी , महांतेश स्वामी आदि उपस्थित होते .