Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

शिक्षकांनी समाजाचे मार्गदर्शक व्हावे.. – मल्लिनाथ कल्याणशेट्टी 

Admin by Admin
September 5, 2024
in शैक्षणिक
0
शिक्षकांनी समाजाचे मार्गदर्शक व्हावे.. – मल्लिनाथ कल्याणशेट्टी 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
कल्याणशेट्टी महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रम 
अक्कलकोट  ( प्रतिनिधी )
आर्थिक प्रगती वेगाने झाल्यामुळे समाजात सातत्याने परिवर्तन होत आहेत, चंगळवाद वाढला आहे, वाचन चिंतन याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे विकृत प्रवृत्ती थैमान घालत आहेत. अशा स्थितीत शिक्षकांनी समाजाचे मार्गदर्शक झाले पाहिजे, असे मत मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था,अक्कलकोट संचलित मातोश्री गुरुबसवा कल्याणशेट्टी महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, सेमी विभाग प्रमुख दिगंबर जगताप, प्रा राजशेखर पवार, प्रा तुकाराम सुरवसे उपस्थित होते. 
पुढे बोलताना ते म्हणाले की, विकृत प्रवृत्ती विरुद्ध समाजाने तीव्र मोहीम हाती घेतली आहे. अशा भीषण परिस्थितीत शिक्षकांनी उपदेश केला पाहिजे. समाजाला विधायक वाट दाखविली पाहिजे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्वपल्ली डॉ राधाकृष्णन व स्व पंचप्पा  कल्याणशेट्टी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रस्ताविक प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा डॉ शितल झिंगाडे यांनी केले तर आभार प्रा भीम सोनकांबळे यांनी मानले.
चौकट -शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल झाला सत्कार -महाविद्यालयातील डॉ बाळासाहेब पाटील यांचा संशोधनाबद्दल तर एन एस एस उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी म्हणून प्रा राजशेखर पवार यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय प्रा डॉ शितल झिंगाडे, प्रा हर्षदा गायकवाड, प्रा तुकाराम सुरवसे, प्रा भिम सोनकांबळे, प्रा मनीषा शिंदे, प्रा विद्याश्री वाले, प्रा शिल्पा धूमशेट्टी, प्रा शीतल फुटाणे, विद्या बिराजदार, प्रा जनाबाई चौधरी, प्रा नेहा गंदमल, प्रा प्राची गणाचारी या प्राध्यापकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .
Previous Post

वटवृक्ष मंदीर समितीची पारंपारिक कार्यपध्दती लक्षवेधक – मा.आ.ॲड.दिलीप सोपल 

Next Post

माहिती अधिकार दिन सरकारी कार्यालयामध्ये साजरा करण्यात बाबत अक्कलकोट तालुक्यातील सर्व कार्यालयामध्ये निवेदन

Admin

Admin

Next Post
माहिती अधिकार दिन सरकारी कार्यालयामध्ये साजरा करण्यात बाबत अक्कलकोट तालुक्यातील सर्व कार्यालयामध्ये निवेदन

माहिती अधिकार दिन सरकारी कार्यालयामध्ये साजरा करण्यात बाबत अक्कलकोट तालुक्यातील सर्व कार्यालयामध्ये निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157237
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697