सामाजिक

अक्कलकोट तालुक्यातील पहिली बौद्ध धम्म परिषद उत्साहात संपन्न

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
भारतीय बौद्ध महासभा अक्कलकोट वतीने
अक्कलकोट तालुक्यातील पहिली बौद्ध धम्म परिषद 
प्रचंड उत्साहात मंगलमय वातावरण पार पडली.
भगवान बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून, पंचशील ध्वजारोहण करून समता सैनिक दल यशसिद्धी आजी-माजी सैनिक यांच्याकडून श्रामणेर संघास मानवंदना हसापूर येथे देण्यात आली.
विश्वाला युद्ध नाही तर बुद्ध गरजेचा आहे !
जग मे बुद्ध का नाम है यही भारत की शान है !
जस्टिस फॉर बुद्धगया ! च्या जयाघोषात अक्कलकोट शहरांमध्ये  शेकडोच्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका बांधव रॅलीमध्ये सहभागी होते. 
अक्कलकोट तालुक्यातील पहिल्या बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्ष बौद्धाचार्य साहिल संजय कांबळे हे होते. सदरची धम्म परिषद अक्कलकोट शहरातील प्रियदर्शनी मंगल कार्यालय येथे संपन्न झाली.
अँड.डॉ.जयसेन गवई राष्ट्रीय उपाध्यक्ष, सुनंदा वाघमारे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष,शारदा गजभिये महाराष्ट्र राज्य विभागीय संघटक, आदी सहप्रमुख वक्त्याचीं प्रमुख विषयावर मार्गदर्शन संपन्न झाले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे, धम्मपाल माने, धम्मरक्षिता कांबळे, मरेप्पा शिवशरण,पूजा घटकांबळे, कमल थोरे, वैशाली खंडाळे सचिन मोरे, ज्योतिबा पारखे, आदी सह जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच उपसरपंच हसापूर गौतम घटकांबळे, ग्रा. सदस्य मारुती घटकांबळे उत्सव समिती अध्यक्ष लक्ष्मण घटकांबळे, सुनील घटकांबळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती हसापूर व बौद्ध समाज बांधव शेकडोंच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात कार्यक्रम पडला पार पडला.
अन्नदान धम्मदान श्रमदान करणाऱ्या मान्यवरांचां याप्रसंगी  सन्मान करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button