द गार्डन ग्रुप पिंपरी चिंचवड या संघटनेच्या वतीने प्रसिध्द उद्योगपती जॉन्सन ठेकाकुमपुराम यांना ” एक साधं सरळ व्यक्तिमत्त्व” २०२५ पुरस्काराने सन्मानित…

पुणे ( प्रतिनिधी ) : द गार्डन ग्रुप पिंपरी चिंचवड ही संघटना गेली काही वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपून, रोज सकाळी गार्डनमध्ये व्यायाम, विरंगुळा करण्यासाठी तरुण, जेष्ठ नागरिक, उद्योजक, स्थानिक रहिवाशी, मुले, स्त्रिया येत असतात.
नियमित येणाऱ्या नागरिकांसाठी संघटना वेगवेगळे उपक्रम आजवर राबवत असते त्याच अनुषंगाने पिंपरी-चिंचवड येथील प्रसिद्ध उद्योगपती द गार्डन ग्रुपचे सन्माननीय, गुरुवर्य, मार्गदर्शक आदरणीय जॉन्शन ठेकाकुमपुराम (अंकल) हे एक उत्तम उद्योजक व आपल्या इंडस्ट्रीयल व्यवसायात अनेक गोरगरीबांना रोजगार देवुन सहाय्य करणारे तसेच त्यांनी उद्योग क्षेत्रात केलेली अप्रतिम प्रगती व रोजगार उपलब्ध करुन देण्याची त्यांची माणसातली, माणुसकीची, नजरबंदी ही कमालीची आहे. त्याचबरोबर लक्षात राहतात ते त्यांच्या बिनधास्त वक्तव्याने, त्यांनी प्रामाणिकपणे केलेले सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक सांस्कृतिक या क्षेत्रातील कामे व उद्योग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ” एक साधं सरळ व्यक्तिमत्त्व” २०२५ पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले .
या कार्यक्रमाचे आयोजन द गार्डन ग्रुप पिंपरी चिंचवडचे नबी लाल मुल्ला, दत्ता गोडसे, अशोकराव चव्हाण, पांडुरंग कर्णे, अल्ताफ शेख, गजेंद्र कांबळे यांनी केले होते व या कार्यक्रमाला नेताजी नखाते, विलास पाडाळे, संजय पगारे, प्रकाश ताम्हणकर, कुंदन शिंगटे यांनी मोलाचे सहकार्य केले.