Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

पुण्यात माणूसकी धर्म ठरला श्रेष्ठ !

Admin by Admin
May 23, 2025
in महाराष्ट्र
0
पुण्यात माणूसकी धर्म ठरला श्रेष्ठ !

Oplus_16777216

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे – वेळ सायंकाळची… मुसळधार पावसाने पुणे शहराची पुरती वाताहत झालेली असताना संस्कृती आणि नरेंद्र यांचा विवाहसोहळाही खोळंबला. लॉनवर पाणी साचल्याने सगळेच काळजीत पडले. शेजारच्या कार्यालयात मोहसीन आणि माहीन यांच्या लग्नाचा स्वागत सोहळा सुरू होता. या दोघांच्या कुटुंबीयांना विवाहसोहळ्याची अडचण समजताच त्यांनी स्वागत सोहळा थांबवला आणि त्या मंडपात संस्कृती आणि नरेंद्र यांच्यावर अक्षतांची उधळण झाली. मोहसीन आणि माहीनच्या सोहळ्यात संस्कृती आणि नरेंद्र यांचा हा अनोखा ‘शादी मुबारक’ सोहळा रंगला.

संस्कृती कवडे आणि नरेंद्र गलांडे यांचा विवाहसोहळा मंगळवारी वानवडी येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या लॉनवर नियोजित होता. सायंकाळी सातच्या मुहूर्तावर हे दोघे लग्नबंधनात अडकणार होते. मात्र, सायंकाळी पाच वाजता आकाशात मळभ दाटून आले अन् अवघ्या काही क्षणांत मुसळधार पाऊस बरसू लागला. संपूर्ण लॉन जलमय झाल्याने लग्नासाठी केलेल्या सजावटीची दाणादाण उडाली. वधू-वराला उभे राहायलाही जागा उरली नाही. सगळे जण आडोशाला थांबून पाऊस थांबावा, यासाठी देवाचा धावा करीत होते.

लॉनच्या शेजारच्या मंगल कार्यालयात मोहसीन काझी आणि माहीन दिलगी या दाम्पत्याच्या स्वागत समारंभ सुरू होता. मोहसीनचे वडील निवृत्त पोलिस अधिकारी फारूक काझी हे पाहुण्यांच्या सरबराईत गुंतले होते. कवडे कुटुंबीयांनी त्यांची भेट घेऊन पावसामुळे लग्न खोळंबल्याची व्यथा सांगितली. काझी यांनी मोहसीन-माहीनच्या स्वागताचा कार्यक्रम थांबवून कार्यालयाचा मंच संस्कृती-नरेंद्रच्या लग्नासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. संस्कृती आणि नरेंद्र यांनी चारही कुटुंबीय, त्यांचे आप्तेष्ट आणि मित्रपरिवार अशा मोठ्या वऱ्हाडमंडळींच्या साक्षीने एकमेकाला वरमाला घातल्या. त्यानंतर मोहसीन आणि माहीनचा स्वागत सोहळा साजरा झाला. ‘गंगा जमुनी तहजीब’ या भारतीय संस्कृतीच्या प्रत्ययाने भारावलेल्या अवस्थेत साऱ्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला.

‘माझ्या एकुलत्या मुलीचे लग्न धूमधडाक्यात व्हावे, हे माझे स्वप्न होते. त्यासाठी आयुष्यभर खस्ता खाल्या. मात्र, पावसामुळे पाणी फेरले गेले असताना काझी कुटुंबीयांनी मंच उपलब्ध करून दिला. हे उपकार मी आयुष्यभर विसरू शकत नाही,’ अशी भावना संस्कृतीचे वडील चेतन कवडे यांनी व्यक्त केली. ‘एका कार्यालयात दोन धर्मातील जोडप्याचा विवाह आणि स्वागत सोहळा पार पडला. धर्मापेक्षा माणुसकी मोठी हे सिद्ध झाले,’ असे संस्कृतीचे काका संजय म्हणाले.

 

Previous Post

राष्ट्रवादी गुंडांची टोळी, उपमुख्यमंत्री अजित पवार या टोळीचे आका आहेत का? : हर्षवर्धन सपकाळ

Next Post

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी फरार राजेंद्र हगवणे आणि मुलाला अटक

Admin

Admin

Next Post
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी फरार राजेंद्र हगवणे आणि मुलाला अटक

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी फरार राजेंद्र हगवणे आणि मुलाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157264
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697