सर्वसामान्यांसाठी कसलीही ठोस तरतूद नसलेला अर्थसंकल्प : खासदार प्रणिती शिंदे

नवी दिल्ली – लोकसभेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, केंद्रीय शेतकरी, मजूर आणि देशातील सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरला. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी नसून केवळ कार्पोरेट हितसंबंध जपणारा असल्याचे स्पष्ट केले.
गृहनिर्माण, प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन योजना यांसारख्या महत्त्वाच्या लोककल्याणकारी योजनांसाठी अर्थसंकल्पात कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही. सामान्य नागरिकांच्या जीवनाशी व दैनंदिन जगण्याशी संबंधित मूलभूत प्रश्नांकडे सरकारने पुन्हा एकदा दुर्लक्ष केल्याचा केला.
या अर्थसंकल्पातून देशातील शेतकरी, शेतमजूर व गरीब घटकांना कोणताही प्रत्यक्ष लाभ मिळालेला नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेसाठी निराशाजनक असून सरकारची जनविरोधी भूमिका स्पष्ट करणारा असल्याचेही खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.



