सामाजिक

अक्कलकोट शहरात अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले महाप्रवेशद्वाराचे उद्घाटन

 

अन्नछत्र मंडळाने अन्नदानासोबत समाज हिताची कामे केली – सिद्धाराम म्हेत्रे
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे दररोज चालणारे अन्नदानाचे कार्य हे जागतिकस्तरावर चर्चेचे ठरले आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व त्यांचे पुत्र कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे अन्नदानाच्या कामासोबतच अक्कलकोट शहरात समाजहिताची अनेक कामे होत आहेत. अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले महाप्रवेशद्वार हे अक्कलकोट शहराच्या सौंदर्यात भर घालणारे आहे. जन्मेजयराजे भोसले यांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून वेगळेपणा जपणाचे काम केले. अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून अन्नदाना सोबत समाज हिताची कामे केली असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले.
रविवारी, अक्कलकोट येथील फत्तेसिंह चौकात उभारण्यात आलेल्या आकर्षक अशा भव्य
 महाप्रवेशद्वाराचे उद्घाटन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी झालेल्या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे  बोलत होते. यावेळी व्यासपीठावर समाधी मठाचे पुजारी वे.सं. अण्णू महाराज पुजारी,म.नि.प्र. बसवलिंग महास्वामी,धनंजय महाराज पुजारी, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार,हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या प्रमुख अलकाताई भोसले, अर्पिताताई भोसले,अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय
खोबरे, सचिव श्यामराव मोरे,विश्वस्त चंद्रकांत कापसे, लाला राठोड, अॅड. नितीन हबीब, माजी
नगराध्यक्षा अनिता खोबरे ,सोलापूरचे नगरसेवक चेतन नरोटे, यशवंत धोंगडे, मनोज कल्याणशेट्टी, मल्लिकार्जुन पाटील,रईस टिनवाला, प्रथमेश इंगळे, सुनील बंडगर, अविनाश मडिखांबे,नन्नू कोरबू, सिध्दार्थ गायकवाड,बंटी राठोड, सुरेशचंद्र सूर्यवंशी,अकिल बागवान, बाळासाहेब कुलकर्णी-देसाई, तम्मा शेळके,मैनोदीन कोरबू, शिवराज स्वामी ,सद्दाम शेरीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी उपस्थित मान्यवराच्यां हस्ते श्री स्वामी समर्थ महाराजाच्यां प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांसह अमोलराजे भोसले यांचे पुत्र चि. हर्षवर्धन भोसले , कन्या स्वामिनी भोसले यांच्याहस्ते फित कापून महाप्रवेशद्वाराचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अश्पाक बळोरगी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिध्दे, महेश
हिंडोळे, बाळासाहेब मोरे, बाबा निंबाळकर, स्मिता कदम यांनी संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे
भोसले व प्रमुख कार्यकारी
अध्यक्ष अमोलराजे भोसले यांनी अन्नदान सेवे सोबतच शहराच्या विकासात देखील मोठे
योगदान दिले . त्यांचे योगदान मोठे आहे असे गौरवोद्गार काढले.
 या कार्यक्रमासाठी चंद्रकांत सोनटक्के , पिंटू साठे,प्रवीण घाटगे, संतोष भोसले, राजू नवले, गोटू माने, पिंकू गोंडाळ,अतिष पवार, अंकुश चौगुले,शहाजी यादव, शीतल फुटाणे,सागर गोंडाळ, रोहित गंगणे, गिरीश गवळी, सरफराज शेख, महांतेश स्वामी , राजू पवार , लक्ष्मण पाटील शुक्राचार्य चव्हाण, बंटी मंगरूळे, सनी सोनटक्के, शिवशरण अचलेर  आदींसह राजे फत्तेसिंह चौक नवरात्र उत्सव मंडळ व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी , कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन श्वेता  हुल्ले यांनी केले. आभार चंद्रकांत सोनटक्के यांनी मानले.
चौकट –
संगीत संध्या कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध
महाप्रवेशद्वार उद्घाटन कार्यक्रम संपल्यानंतर महाराष्ट्राचे महागायक मोहम्मद अय्याज व सहकालाकारांचा सूर सरगम
प्रस्तुत ‘संगीत संध्या’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहाजी हायस्कूलच्या प्रांगणामध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात गायक मोहम्मद अय्याज व सहकलाकारांनी हिंदी व मराठी लोकप्रिय गीतांसह भक्तिगीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button