साहेबशाह गुलजारशाह पठाण यांचे वृद्धप काळाने निधन

नायगांव (- सय्यद अजिम नरसीकर )
लोहा तालुक्यातील किवळा येथील ज्येष्ठ नागरिक साहेबशहा गुलजारशहा पठाण यांचे वयाच्या १०५ वर्षे वृध्दापकाळाने काल दि १ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी १.३० वाजता येथील कब्रस्तानामध्ये दफनविधी करण्यात आले.
किवळा येथील ज्येष्ठ नागरिक साहेबशहा गुलजारशहा पठाण हे मनमिळाऊ स्वभावाचे व सर्व समाजात आपुलकीने वागणारे व्यक्तीमत्व होते. ते गेल्या सहा महिन्यापासून अत्यंत अस्वस्थ झाले होते. त्यांच्यावर उपचार चालू असतानाही त्यांची काल दि १ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, नातू, नाती असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दि २ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता येथील कब्रस्तान मध्ये दफन विधी पार पडला. ते नरसी येथील ग्राम पंचायत चे सदस्य सय्यद इस्माईलसाब यांचे सासरे व नायगांव तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सय्यद जाफर यांचे आजोबा होते.