सामाजिक
मंगरुळे प्रशालेतील विद्यार्थ्यांना महेश हिंडोळे यांच्याकडून पाच सायकली भेट

अक्कलकोट ( प्रतिनिधी ):- येथील मंगरुळे प्रशालेत समर्थ प्रतिष्ठानकडून माजी उपनगराध्यक्ष महेश हिंडोळे यांच्या हस्ते मंगरुळे प्रशालेतील पाच विद्यार्थ्यांना मोफत सायलक वाटप करण्यात आले.
सदर उपक्रमामुळे समाजातील विविध घटकांतील गोरगरीब होतकरू विद्याथ्यर्थ्यांना पाच सायकलचे वाटप केले. याच शाळेला ये जा करण्यासाठी चांगलं सोय झाला आहे. असे एकंदरीत चाळीस हजार रुपयांच्या पाच सायकली असून त्याच लाभ विद्यार्थिनी कु.श्रुती स्वामी, कु.सार्थक सावंत, जैनब शिकलगार, विद्याश्री नरूणे व रंजीता जकापुरे या विद्याथ्यर्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले. प्रशालेच्या वतीने विद्यार्थीना ही भेट दिल्याबद्दल मुख्याध्यापक एन. एस. कदम व शिक्षक वृंद यांच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, यावेळी प्रा भीमराव साठे, शिवशरण जोजन,दयानंद बिडवे,,अप्पू रोडगे, अशोक स्थावरमठ, शिक्षक पाटील, रविंद्र वाघमोडे,शिक्षिका, शिक्षेकत्तर कर्मचारी उपस्थित होते.
इन्फोबॉक्स:- समर्थ प्रतिष्ठानकडून मागील पाच वर्षात आशा प्रकारचे सामाजिक उपक्रम केले जाते. या माध्यमातून गोरगरिबांना मदतीचा हात देण्याचं काम सुरू आहे. माजी उपनगराध्यक्ष महेश हिंडोळे यांनी या साठी आर्थिक योगदान देत असतात.
