राजकीय

उपमुख्यमंत्री फडणवीस यांची आमदार कल्याणशेट्टींच्या पाठीवर कौतुकाची थाप !

 

सचिन दादांचे वाढले बळ !
अक्कलकोट (स्वामीराव गायकवाड )अक्कलकोट येथे दिनांक ८ ऑक्टोबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौरा केला .यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या विकास कामांचे कौतुक करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी बाबत सूचक वक्तव्य केल्याने आमदार सचिन दादांचे बळ वाढले आहे.
 राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये अक्कलकोट शहरात दिनांक ८  ऑक्टोबर रोजी विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि जाहीर सभा ही राजे फत्तेसिंह मैदानावर संपन्न झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या सभेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी धुवांधार बॅटिंग करत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या विकास कामांचे कौतुक केले. आमदार सचिन कल्याणशेट्टी हे मतदार संघासाठी मिळालेला हिरा असून अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाच्या कल्याणासाठी सचिन कल्याणशेट्टी यांच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन ही देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार सचिन दादांच्या पाठीवर एक प्रकारे कौतुकाची थाप मारल्याने त्यांचे पक्षांतर विरोधकांना संदेश गेला आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात मागील ७५ दिवसात ३८३ कोटींचा बंपर विकास निधी आणला आहे. तसेच देगाव एक्सप्रेस कालव्यासाठी ३५० कोटी रुपये अक्कलकोट शहरातील भूमिगत गटार योजना १६७ कोटी, अक्कलकोट शहरातील रस्ते विकास १०२  कोटी , अक्कलकोट शहर पाणीपुरवठा अमृत दोन योजना ७५  कोटी ,मैंदर्गी शहर पाणीपुरवठा योजना २५  कोटी दुधनी शहर पाणीपुरवठा योजना ४७ कोटी, दुय्यम निबंधक कार्यालय , उत्तर दक्षिण पोलीस ठाणे नूतन इमारतीसाठी निधी आणल्याने आमदार सचिन कल्याणशेट्टी हे अग्रेसर ठरले आहेत. त्यांच्या विकास कामांची चर्चा ही अक्कलकोट विधानसभा मतदार संघात रंगली आहे . विविध विकास कामांमुळे आमदार कल्याणशेट्टी यांची मजबूत पकड मतदार संघात निर्माण झाली आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या विकास कामांचे कौतुक करत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचा पाणीदार आमदार म्हणून उल्लेख केला आहे. उजनी धरणातील पाणी हे देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रमा दिल्याने आल्याचे आमदार कल्याणशेट्टी यांनी आवर्जून सांगितले आहे. काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये उजनी धरणातील पाण्यावरून राजकीय स्पर्धा सुरू असताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सुप्रमा दिल्याने उजनीचे पाणी कुरनूर धरणात आल्याचे सांगितले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा दौरा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासाठी फलदायी ठरला आहे.  उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे कौतुक करत पाठीवर थाप मारल्याने आमदार सचिन दादांचे वजन वाढले  आहे. पुढील पाच वर्षात कामे करण्यासाठी काही कामे शिल्लक ठेवा असेही सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी जाहीर सभेत केले आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अक्कलकोट दौरा हा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बळ वाढविणारा ठरला असल्याने या दौऱ्याबाबत आता अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात चर्चा रंगली आहे .उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या या दौऱ्यामुळे आता आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे पक्षांतर विरोधक ही बॅक फुटला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button