सामाजिक
श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात पत्रकार राजेश जगताप यांचा सत्कार

अक्कलकोट ( प्रतिनिधी )महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडियाच्या सोलापूर लोकसभा जिल्हाध्यक्ष पदी पत्रकार राजेश जगताप यांची निवड झाल्या बद्दल श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समिती तर्फे सत्कार करण्यात आला. देवस्थान समितीचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते राजेश जगताप यांना कृपावस्त्र , प्रसाद प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना ग्रंथालय सेलचे राज्याध्यक्ष बी जी देशमुख , ग्रंथालय सेलचे मराठवाडा अध्यक्ष दिपक गिरी , ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष देवीदास राठोड , महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य स्वामीराव गायकवाड , देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे , विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, संजय पवार , सोनार, पवार आदीसह कर्मचारी , सेवेकरी उपस्थित होते.



