सामाजिक

अक्कलकोट  येथे वंचित बहुजन माथाडी कामगार संघटनेच्या वतीने   महामानव  विश्वरत्न  डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांची जयंती  उत्साहात साजरी

 अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट मंगरूळ हायस्कूल चौक येथे वंचित बहुजन माथाडी कामगार संघटनेच्या वतीने महामानवविश्वरत्न  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त मंगरुळे चौक अक्कलकोट येथे फोटो पुजन करण्यात आले .

वंचित बहुजन माथाडी कामगार संघटना अक्कलकोट  च्या वतीने अक्कलकोट मधील बांधकाम कामगार व कर्मचारी व पत्रकार राजेश जगताप पत्रकार स्वामीराव  गायकवाड इंजिनिअर मनोज लोणी यांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे फोटो पूजन करण्यात आले. तालुकाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे यांच्यावतीने  अक्कलकोट  मधील बांधकाम कामगारांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ सोलापूर डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष पत्रकार राजेश जगताप , महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य कार्यकारिणी  सदस्य स्वामीराव गायकवाड  यांचा सत्कार करण्यात आला या दरम्यान  कामगार संघटने च्या वतीने बांधकाम कामगार यांना नोंदणीकृत ओळख पत्र वाटप करण्यात आले व वाटप केलेल्या बांधकाम नोंदणीकृत कार्डाचे उद्दिष्ट कामगारांना कामावर असताना मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये अनुदान नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये अनुदान अटल बांधकाम कामगार आवास योजना चार लाख रुपये अर्थसहाय्य मृत्यू झाल्यास त्यांच्या पत्नीस अथवा पतीस प्रतिवर्षी २४ हजार रुपये पाच वर्ष मदत गंभीर आजाराच्या उपचारार्थ एक लाख रुपये अर्थसाह्य शैक्षणिक अनुदान नोंदणी करून बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी पहिले ते सातवी प्रतिवर्षी  दोन हजार पाचशे  दोन मुलांकरिता आठवी ते दहावी प्रतिवर्षी पाच  हजार रुपये इयत्ता दहावी ते बारावी प्रतिवर्षी दहा  हजार रुपये  अकरावी बारावीच्या शैक्षणिक साठी प्रतिवर्षी १०  हजार रुपये पदवी अभ्यासक्रम शिक्षणासाठी प्रतिवर्षी २०  हजार रुपये एमएस-सीआयटी शिक्षण मोफत वैद्यकीय शिक्षणाकरिता प्रतिवर्षी एक  लाख रुपये पहिल्या दोन मुलांकरिता व अभियांत्रिकी शिक्षणाकरिता प्रतिवर्षी ६० हजार  रुपये असे कॉलरशिप म्हणून ह्या योजना कामगार संघटनेच्या वतीने सिद्धार्थ बनसोडे यांनी कामगारांना योजनेचा लाभ घेऊन देण्यास प्रयत्न केले अनेक बांधकाम कामगार नोंदणीकृत आहेत यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे व तसेच शासनमान्य पदविकेत साठी प्रतिवर्षी वीस हजार रुपये पदव्युत्तर पदवीसाठी प्रतिवर्षी २५ हजार रुपये कामगारांच्या पहिल्या मुलीच्या लग्नासाठी ५१ हजार रुपये अर्थसाह्य अनुदान ज्या कामगारांचे लग्न झाल्यास त्या कामगारांना तीस हजार रुपये अर्थसहाय्य असे या कामगारांच्या नोंदणीकोट कार्डाचे उद्दिष्टे आहेत. तालुकाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांना कार्ड वाटप करण्यात आले. या वेळी तालुका अध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे युवक तालुका अध्यक्ष शिलामनी बनसोडे तालुका सरचिटणीस अमोल शिंदे शहर अध्यक्ष वाशिम खासबागदार आदी पदाधिकारी  ठेकेदार व कामगार कर्मचारी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button