सामाजिक
राष्ट्र उभारणीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मोलाचे योगदान – आमदार सचिन कल्याणशेट्टी

अक्कलकोट भीमनगरमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
भारतरत्न , भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी एका जाती धर्मासाठी काम केले नाही. त्यांनी देशातील सर्वच जाती धर्मासाठी काम केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना एका जाती पुरते मर्यादित न ठेवता त्यांना व्यापक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. भारतीय संविधानाद्वारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वाना समान अधिकार दिले आहेत. त्यांच्या विचारधारेने देश जात असून डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक स्तरावरील उत्तुंग व्यक्तीमत्व होते. त्यांच्या विचारधारेने गेल्यास सर्वाचीं प्रगती होणार आहे.राष्ट्र उभारणीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मोलाचे योगदान आहे असे प्रतिपादन अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त भिमनगर अक्कलकोट या ठिकाणी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थिती मध्ये प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक.मिलन कल्याणशेट्टी, पोलीस उपविभागीय अधिकारी विलास यामवार,पोलीस निरीक्षक राजेंद्र टकणे, दक्षिण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश स्वामी,तहसीलदार विनायक मगर,महेश हिंडोळे, यशवंत धोंगडे,विजय हर्डीकर प्रथमेश इंगळे , पत्रकार मारूती बावडे , स्वामीराव गायकवाड , राजेश जगताप , रमेश भंडारी , संतोष पराणे,नागराज कुंभार, शिवशरण जोजन, कांतू धनशेट्टी , अविनाश मडीखांबे,उत्तम गायकवाड,चंद्रशेखर मडीखांबे आदीची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संदीप मडिखांबे ,
कल्याणी घाडगे,अर्जुन साळे,भारत सोनकांबळे,विजयकुमार बाळशंकर,दत्ता मडीखांबे,तमा सुतार,गंगाराम मडीखांबे,शिवशरण शिंदे, अंबादास बनसोडे, विरपक्ष माने, स्वामीराव मडीखांबे, जयंती उत्सव अध्यक्ष: सतीश सुतार, उपाध्यक्ष: रोहित वाघमारे, महादेव बनसोडे, अजय मडीखांबे, खजिनदार: स्वामीनाथ गायकवाड, सचिव: तुषार गायकवाड, सहसचिव: दशरथ मडीखांबे, विजय मडीखांबे, पांडुरंग घाटगे, कार्याध्यक्ष: लखन वेस्कर, सहकार्याध्यक्ष: सिद्धार्थ मडीखांबे पप्पू इब्रामपूर, दत्ता शिंदे शुभम मडीखांबे,नागेश मडिखांबे,अमित बनसोडे, सचिन बनसोडे, बाळासाहेब शि मडीखांबे, शिलमनी बनसोडे, नितेश मडिखांबे,सिद्धाराम मडिखांबे, दिनेश रुही,व सर्व समाजामधील बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित होते.