सामाजिक

अक्कलकोट आगारासाठी नव्या दहा एस.टी. बसेस दाखल, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पूजन

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) 
अक्कलकोट आगारात एस.टी. महामंडळाच्या नव्याने १० बसेस आज दाखल झाल्या. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या एस.टी. प्रवाशांच्या सोयीसाठी या बसेस मोठ्या संख्येने उपलब्ध करून देण्याचा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा  प्रयत्न आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी  अक्कलकोट आगार येथे उपस्थित राहून या बसेसचे विधिवत पूजन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. 
मुख्यमंत्री . देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यातील एस.टी. सेवा अधिक सक्षम, आधुनिक आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने सातत्याने पावले उचलत आहोत. अक्कलकोट आगारात भविष्यात आणखी नव्या एस.टी. बसेस, सुधारित सेवा आणि प्रवाशांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा निर्धार आहे असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी याप्रसंगी केले.
याप्रसंगी विभाग नियंत्रक  अमोल गोंजारी, विभागीय वाहतूक अधिकारी  अजय पाटील, विभागीय यंत्र अभियंता (चा) सौ. शितल बिराजदार, विभागीय स्थापत्य अभियंता. तुषार चौधरी, विभागीय कर्म वर्ग अधिकारी सौ. मालन बनसोडे, आगार व्यवस्थापक . रणजित साळवे, वाहतूक निरीक्षक . नागेश रोडगे, वाहतूक निरीक्षक  पवन हनगल, प्रभारक  संजय कांबळे, . शिवशरण जोजन, . मल्लिनाथ स्वामी, . परमेश्वर यादवाड, . संजय देशमुख,  अविनाश मडिखांबे,  यशवंत धोंगडे,  अप्पासाहेब पाटील,  प्रभाकर मजगे, . महेश जानकर,. भिमराव साठे, श्री. विलास गव्हाणे,  राजेंद्र बंदिछोडे,  नन्नूभाई कोरबू, श्री. दत्तात्रय मुनाळे, . निजप्पा गायकवाड, . प्रदिप पाटील, . कांतू धनशेट्टी,  नागराज कुंभार, . धोंडप्पा बनसोडे,  विनोद मोरे,  अतिष पवार, . सचिन पवार, . राहूल काळे आदीसह आगारातील असंख्य वाहक-चालक आणि कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button