सामाजिक

अक्कलकोट शहरातील हत्ती तलावाच्या विकासासाठी १० कोटीचां निधी मंजूर ,आम. सचिन कल्याणशेट्टीचां पाठपुरावा

अक्कलकोट ( प्रतिनिधी )

हत्ती तलावाच्या संगीत कारंजेसाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाल्याने शहराच्या सौंदर्य वृद्धीसाठीच्या या कामासाठीच्या एकूण १० कोटींच्या निधीने काम पूर्ण होणार आहे.
अक्कलकोट शहरात सध्या वाढत असलेल्या स्वामी भक्तांचा ओघ भविष्यात आणखी वाढावा आणि आलेले स्वामीभक्त या ठिकाणी राहून अक्कलकोट शहरातील नैसर्गिक आणि धार्मिक वैविध्य अनुभवावे यासाठी आमदार सचिन  कल्याणशेट्टी यांचे सर्व तऱ्हेचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून श्री स्वामी समर्थ मंदिरा जवळ असलेल्या हत्ती तलावात आकर्षक विद्युत रोषणाईने युक्त संगीत कारंजा बसवण्यासाठी पाच कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. यासाठी प्रशासकीय मान्यता मिळालेले असून लवकरच हे काम सुरू होऊन हत्ती तलावाच्या म्हणजेच शहराच्या सौंदर्यात आणखी वाढ होणार आहे.आतापर्यंत हत्ती तलाव कामास एकूण दहा कोटी मिळाले आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्यामुळे हत्ती तलावाच्या विकासासाठी दहा कोटी रुपयाचा निधी मिळाल्याने या कामास गती येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button