सामाजिक

मुख्य अभियंता कार्यालय देहू येथे सलग तीन दिवस अधिकारी गैरहजर – नागरिकांची मोठी गैरसोय

 

देहू / पुणे ( अशोक शिवशरण )– महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयात अधिकारी सलग तीन दिवस अनुपस्थित राहिल्याने नागरिकांना अर्ज देण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन, देहू गाव यांच्यातर्फे या गंभीर दुर्लक्षाविरोधात आंदोलन करण्यात आले.

अध्यक्ष बापूराव बनसोडे आणि पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, मुख्य अभियंता झोडगे साहेब हे सतत अनुपस्थित राहत असल्याने नागरिकांचे अर्जही स्वीकारले जात नाहीत. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना उन्हात तासनतास थांबावे लागत आहे. वारंवार अनियमित वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचे विद्युत उपकरणे जळत आहेत, सर्रास वीज चोरी होत असूनही अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.

नागरिकांच्या तक्रारींकडे प्रशासन दुर्लक्ष करत असून, साधा अर्ज स्वीकारण्यासाठीही कार्यालयात लिपीक उपलब्ध नाही. तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर त्रस्त झालेल्या संघटनेने अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला अर्ज अर्पण करून निषेध नोंदवला.

हे प्रकरण गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. अन्यथा अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button