सामाजिक

बालाजी मेकाले यांच दुःखद निधन

नायगाव (प्रतिनीधी )
नायगाव येथील म.रा.वि.वि.कंपनीतील ऑपरेटर व नरसी येथील रहिवासी बालाजी माधवराव मेकाले वय ३८ वर्ष यांच दि.१२ फेब्रुवारी २०२५ रोजी बुधवारी सायंकाळी ७ वाजता हैद्राबाद येथील दवाखान्यात उपचार दरम्यान दुःखद निधन झाले आहे.
स्व. बालाजी मेकाले यांच्या पार्थिवावर दि. १३ रोजी गुरुवारी दुपारी २ वाजता नरसी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात आई , वडील, पत्नी , दोन मुल, एक भाऊ, भावजई, दोन बहीण, असा मोठा परिवार आहे. ते नरसी येथील सेवानिवृत्त लाईनमन माधवराव मेकाले यांचा मुलगा होत. ते अतीशय मनमिळाऊ स्वभावाचे होते‌.अंत्यविधीस गावातील नागरिक पाहुणे मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button