सामाजिक

जीवनगौरव पुरस्कार म्हणजे सासुरवाडीचा बहुमान आहे – माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार

 

नायगाव / नांदेड (- सय्यद अजिम नरसीकर )

महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने मला दिलेल्या जीवन गौरव पुरस्कार म्हणजे सासुरवाडीच्या बहुमान असून सत्कार आशीर्वाद प्रेम तो आनंद सातपट द्विगुणीत असतो असे उद्गार राज्याचे माजी मंत्री तथा आमदार सुधीर  मुनगंटीवार यांनी त्यांना देण्यात आलेल्या जीवनगौरव पुरस्कार सत्कार सोहळ्यात आपले विचार व्यक्त केले या पुरस्कारात मुनगंटीवार यांना सह पत्नीक सन्मान चित्र, मानपत्र , व एक लाख रुपयांचा धनादेश प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला, हा पुरस्कार सोहळा वासवी भवन नांदेड आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण तर दुसरा पुरस्कार उत्कृष्ट संसद पटू पुरस्कार म्हणून हिंगणघाटचे  आमदार समीर  कुणावार, यांना सन्मान चित्र प्रमाणपत्र देऊन करण्यात आला या प्रमुख अतिथी माजी मंत्री सुधीर  मुनगंटीवार यांच्या पत्नी सौ सपना मुनगंटीवार, आमदार अमर राजूरकर, हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वासवी माता व रंगनाथ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले, प्रास्ताविक महासचिव गोविंदराव बिडवई यांनी मांडले अध्यक्ष भाषणात म्हणाले की माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण म्हणाले की सुधीर मुनगंटीवार व माझे संबंध मित्रत्वाचे असून त्यांनी अर्थमंत्री व वनमंत्री असताना चांगल्या प्रकारे कारभार सांभाळला महाराष्ट्रात इतिहास घडवून महाराष्ट्राची तिजोरी नियोजनबद्ध हाताळले व सर्वसामान्याला न्याय देण्याचे काम केले सुधीर जी आपणास श्रेष्ठ दिला कारण विराट कोहली आयपीएल मध्ये चांगल्या बॅटिंग खेळल्यानंतर त्याला रेस्ट दिला जातो तसा आपणास पक्षाने रेस्ट दिला असून तो रेस्ट संपल्यानंतर विराट कोहली सारखे षटकार मारून आपण पुन्हा राजकारणात बॅटिंग कराल अशी खात्री मला आहे असे मत खा अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले. विधिमंडळातील स्पष्ट व्यक्ती म्हणून त्यांना ओळखले जाते अशा जीवन गौरव पुरस्कार मला अध्यक्ष म्हणून बोलवून माझा सन्मान केला त्याबद्दल मी महासभेचे आभारी आहे असे खा अशोकराव चव्हाण यांनी आपल्या भाषणात मत व्यक्त केले , दुसरे सत्कारमूर्ती समीर व नावाने सुद्धा माझे मार्गदर्शक व मोठे बंधू म्हणून मानतो सुधीर मुनगंटीवार यांना मी सदैव पाहत असून त्यांचे काम हे महाराष्ट्रात उल्लेखनीय आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही असे मत हिंगणघाट चे आमदार समीर  कनावर यांनी आपले मत व्यक्त केले कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार तर कार्याध्यक्ष भानुदास वट्टमवार महासचिव गोविंदराव बिडवई, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, तसेच बांधकाम समिती अध्यक्ष डॉ सूर्यकांत शिरपेवार, कार्याध्यक्ष सुमित रुद्रवार सचिव सदानंद मेडेवार ,कोषाध्यक्ष अनिल मनाठकर, महिला अध्यक्ष माधुरी कोल्हे, सचिव बबिता अष्टीकर ,कार्याध्यक्ष सुलभा वट्टमवार, सल्लागार एकनाथ मामडे ,डॉक्टर डी आर मुखेडकर, पुणे जिल्हाध्यक्ष काप्रतवार,महासभेचे उपाध्यक्ष दिलीपराव कंदकुर्ते, नंदकुमार मडगुलवार, सखाराम निलावार, सुधीर पाटील सहसचिव प्रणव मनुरवार, कोषाध्यक्ष लक्ष्मीकांत मुक्कावार, प्रसिद्धी प्रमुख गजानन चौधरी ,डॉ विजय बंडेवार ,किरण मुक्कावार व प्रमुख संघटक प्रमुख प्रदीप कोकडवार, सदस्य विलास कोडगिरे ,राम पत्तेवार ,उत्तम अण्णा चौधरी, विजयकुमार कुंचनवार , साईनाथ मेडेवार,महेश पत्तेवार, रमाकांत रायेवार, सुरेश पोकलवार, प्रशांत पोपशेटवार, प्रभाकर पत्तेवार, गजानन बंडेवार, यांच्यासह नांदेड जिल्ह्यसह महाराष्ट्रातील समाज बांधव महिला पुरुष सहकुटुंब सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button