शिवसेना कामगार सेनेकडून शांताई आश्रम शाळेत खाऊ वाटप

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्हा कामगार सेना व अक्कलकोट तालुका कामगार सेना व अक्कलकोट शिवसेना शहर महिला आघाडी यांच्यावतीने शांताई आश्रम शाळा सोलापूर येथे अनाथ बालकांना खाऊ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सोलापूर जिल्हा लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाप्रमुख अमोल शिंदे व सोलापूर जिल्हा कामगार सेना जिल्हाप्रमुख साहेबांना तेगेळी शिवसेना सोलापूर जिल्हा महिला आघाडी जिल्हा संपर्क अनिता माळगे अक्कलकोट कामगार सेना तालुकाप्रमुख स्वामीनाथ हेगडे , अक्कलकोट शिवसेना शहर महिला आघाडी प्रमुख वैशाली हावनूर कामगार सेना अक्कलकोट शहर उपप्रमुख आकाश बबलाद , लक्ष्मी रामनळी , निशांत तेगेळीं यांच्या प्रमुख उपस्थिती होती. उपस्थिताच्यां हस्ते अनाथ बालकान खाऊचे वाटप करण्यात आले.



