Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून एकात्मता जोपासणे, डॉ शंकर गड्डमवार

Admin by Admin
January 23, 2025
in सामाजिक
0
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून एकात्मता जोपासणे, डॉ शंकर गड्डमवार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नायगाव / नांदेड (- सय्यद अजिम नरसीकर )
……………………………………‌………
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वंयसेवकांनी निष्ठापूर्वक कार्य केल्यास देशातील जात धर्म पंथ लिंग हा भेदभाव मुळातून नष्ट होऊन राष्ट्रीय एकात्मता निर्माण होऊ शकते आणि या पद्धतीने निर्माण झालेली एकात्मता कोणीही भेदू शकत नाही असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत सेवानिवृत प्रोफेसर डॉ शंकर गड्डमवार यांनी शरदचंद्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या मौजे परडवाडी येतील विशेष शिबीराच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. हरीबाबू होते. पुढे बोलताना डॉ गड्डमवार म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेतील विचार्थ्यानी गावातील रस्त्यावरील कचरा, नाल्यातील घाण साफ केले,वनीकरणाचे कार्य केले म्हणजे गावकऱ्याना त्यांची जबाबदारी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. रस्ते,नाले साफ करण्या अगोदर त्या घाण होणार नाहीत याची काळजी गावकऱ्यांनी घेतली पाहीजे ही आपली जबाबदारी आहे हे सांगण्याचा केलेला प्रयत्न स्तूत्य आहे असे ते म्हणाले.विद्यार्थ्याना कोणत्याही माध्यमातून शिक्षण देणे ही सरकारची जबाबदारी असते इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांची फीस सरकारनेच भरली पाहीजे त्यासाठी जनआंदोलनाची आवश्यकता आहे. रेवडी वाटण्यापेक्षा शिक्षणावरचा खर्च 6% पेक्षा अधिक करून शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी सरकारने प्रयत्न करण्यासाठी जनतेनी पुढाकार घ्यावा असे डॉ गड्डमवार यांनी आवाहन केले. अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ. के.हरीबाबू यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे कौतूक करून भविष्यामध्ये एक चांगला जबाबदार नागरीक व्हावे. वाहतूकीचे नियम पाळण्याबाबत,वडीलधार्यांना सन्मान, महाविदयालयाचे नाव उज्वल करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यानी विविध स्पर्धामध्ये प्राविण्य मिळविल्याबद्दल त्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले त्यानंतर साईनाथ नामवाडे, कु अनुराधा चव्हाण, कु कानोले, झगडे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. राऊत यांच्या संशोधनास पेटेंट मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी विचारपीठावर सरपंच सौ. संगीताताई परडे, उपसरपंच प्रभू पाटील कौठकर,ग्रामसेवक आगलावे, मुख्याध्यापक शेख,ग्रा.पं.सदस्य रामराम पा.बोरकर, गंगाधर वजीरगे, मारोती पाटील वनाळे, नारायण पा.कराळे,यांची उपस्थिती होती. प्रा अशोक कुमनाळे यांनी प्रास्ताविक मांडले. कार्यक्रमाधिकारी प्रा. एम.एस. कदम व प्रा. डॉ. पी. डी. तावडे या दोघांनी विशेष शिबीरासाठी अत्यंत मोलाचे योगदान दिले. प्रा. डॉ गो. रा. परडे यांनी सरपंच प्रतिनिधी म्हणून स्वंयसेवकांना कोणतीही कमतरता व त्रास होणार नाही म्हणून काळजी घेतले. शेवटी सर्वांचे आभारही त्यांनीच मानले.यावेळी डॉ . बलभीम वाघमारे, डॉ. प्रफुल कुलकर्णी, डॉ.एन.पी.सानप, डॉ.सौ.एस.एस.शिदे, डॉ.बी.आर.लोकलवार,प्रा.बालाजी गायकवाड ,प्रा.हनमंत हांडे, यासह कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका व गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Previous Post

पत्रकार मनोहर मोरे यांना नायगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीने मोटारसायकल भेट.

Next Post

नायगाव ग्रामसेवक संघटनेच्या तालुकाअध्यक्ष पदी टी. जी. रातोळीकर यांची बिनविरोध निवड

Admin

Admin

Next Post
नायगाव ग्रामसेवक संघटनेच्या तालुकाअध्यक्ष पदी टी. जी. रातोळीकर यांची बिनविरोध निवड

नायगाव ग्रामसेवक संघटनेच्या तालुकाअध्यक्ष पदी टी. जी. रातोळीकर यांची बिनविरोध निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156963
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697