Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

पत्रकार मनोहर मोरे यांना नायगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीने मोटारसायकल भेट.

Admin by Admin
January 23, 2025
in सामाजिक
0
पत्रकार मनोहर मोरे यांना नायगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीने मोटारसायकल भेट.
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नायगाव / नांदेड (:- सय्यद अजिम नरसीकर )

नायगाव तालुका मराठी पत्रकार संघातील सदस्य मनोहर मोरे यांची मागील चार महिन्यापूर्वी मोटारसायकल चोरीस गेली असता मनोहर मोरे यांनी वृत्तपत्र वितरक असल्याने त्यांना उद्भवणाऱ्या समस्यांला व अडचणीचा सामना करत एका मोठ्या जिद्दीने ते काम करत असून मात्र जाण्या येण्यासाठी मोठ्या समस्या निर्माण होत असल्याने नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दि. 22-1- 2025 रोजी नरसी येथील शासकीय विश्रामगृह येथे कार्यक्रमात मोटारसायकलची भेट देऊन नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाने घालून दिला नवीन आदर्श.

प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवारंच्या हस्ते करण्यात आले आहे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा मराठी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष पांडागळे, रवींद्र संगमवार, राम तरटे, सूर्यकांत सोनखेडकर, जिल्हा निरीक्षक प्रशांत गवळी, सुभाष पेरकेवार, प्रभाकर लकपत्रेवार, पंडित वाघमारे, गंगाधर भिलवंडे, नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बरगे, रघुनाथ सोनकांबळे, आदी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे यांनी उपस्थित पत्रकार यांना बोलत असतानां म्हणाले की वृत्तपत्र विक्रेत्यामुळे पत्रकारांची किंमत व ओळख वृत्तपत्र विक्रेते घराघरांमध्ये जाऊन वृत्तपत्र विकतात आणि त्यासाठी लागणारी अतिशय मेहनत मोठी आहे. म्हणून नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाने राबवलेला उपक्रम हा अभिमानाची गोष्ट असून नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या प्रेरणादायी संकल्पनेतून मनोहर मोरे यांना मोटारसायकल भेट देऊन एक आदर्श निर्माण केले आहे. मनोहर मोरे यांच्यासाठी नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाने एक मदतीचा हाथ देऊन नवा आदर्श व एक इतिहास जमा केला आहे.पुढे संतोष पांडागळे बोलताना म्हणाले की, आगामी काळात संघातील गट तट बाजूला करून एक दिलाने काम करूया आणि जिल्ह्यातील सोळा तालुक्यात मराठी पत्रकार भवन उभारून एका प्रकारे पत्रकारासाठी सोईस्कर बसण्याची व्यवस्था त्यात वाचनालय व इतर सुविधा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी कडे साकडं घालून काम करून घेऊ या. आणि मराठी पत्रकार संघाला 80 वर्षाची परंपरा आहे ती अबाधित ठेवण्यासाठी आपण सर्व एकजूट राहणे व एका दिलाने काम करणे हेच उपयुक्त ठरेल. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष समारोप माजी जिल्हाध्यक्ष गोवर्धनजी बियाणी यांनी केले आहे. आणि ते बोलताना म्हणाले की माझ्या काळातील मी मराठी पत्रकार संघासाठी चांगले काम करण्याचा प्रयत्न केला आणि नांदेड येथे पत्रकार भवन साठी जागा पदरी पाडून घेण्यात यशस्वी ठरलो आणि त्यांचे पायाभरणी व पूर्ण काम करण्यासाठी पांडागळे यांना साथ देऊन ते काम पूर्ण करू असे ते म्हणाले. सदर कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपापले मत मांडून व सखोल मार्गदर्शन करून कार्यक्रमात भर घातली आहे.
यावेळी उपस्थित, नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रामप्रसाद चन्नावार, गोविंद नरसीकर, दिलीप वाघमारे, भूषण पारळकर, माधव चव्हाण, शेषराव कंधारे,तानाजी शेळगावकर, शेखअरिफ ,साहेबराव धसाडे,सय्यद अजीम ,तेलंग, माने सर, सय्यद जाफर,सिद्धार्थ गजभारे, दीपक गजभारे, देवराव नारे,रामराव ढगे, अशोक वाघमारे हुस्सेकर,अनिल कांबळे, बालाजी हानमंते, धम्मदीप भद्रे, धम्मा भेदेकर, परमेश्वर जाधव,रामकृष्ण मोरे, प्रकाश महिपाळे,अंकुश देगावकर,शेषराव बेलकर, आनंदा डाकोरे,विरेंद्र डोंगरे, श्याम गायकवाड, दिगंबर झुंबाडे, यशवंत मोरे,ज्ञानेश्वर तोडे, गंगाधर कांबळे, सहदेव तुरटवाड व इत्यादी उपस्थित होते.
तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रभाकर लखपत्रेवार यांनी केले व सूत्रसंचालन गंगाधर गंगासागरे यांनी केले कार्यक्रमास उपस्थिताचें आभार गोविंद नरसीकर यांनी केले आहे.

Previous Post

कोळगाव धरणातून बेकायदा वाळू उपसा; बोटीसह परराज्यातील तिघे ताब्यात, बोटमालक फरार…

Next Post

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून एकात्मता जोपासणे, डॉ शंकर गड्डमवार

Admin

Admin

Next Post
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून एकात्मता जोपासणे, डॉ शंकर गड्डमवार

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून एकात्मता जोपासणे, डॉ शंकर गड्डमवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156962
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697