सामाजिक

निर्भिड पत्रकार संघाचे पुरस्कार जाहिर

 

मुकनायक पुरस्कार संपादक विजयकुमार वाव्हळ , ज्ञानेश्वर लंगे व अरविंद ओव्हाळ यांना जाहिर 

माजलगाव भूषण पुरस्काराने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा होणार सन्मान .

माजलगाव : ( प्रतिनिधी )
माजलगाव निर्भिड पत्रकार संघाच्या वतीने येथील मुकनायक व माजलगाव भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन या वर्षीच्या मुकनायक पूरस्काराचे मानकरी संपादक विजयकुमार वाव्हळ , ज्ञानेश्वर लंगे व अरविंद ओव्हाळ यांना जाहिर करण्यात आले आहेत तर माजलगाव भुषण पुरस्कारासाठी सामाजिक क्षेत्रातील विजयदादा साळवे , संभाजी आबा शेजुळ , डॉ. दिपक कोडगीरकर , शिवाज्ञा कोचिंग क्लासेस चे संस्थापक जिवन नखाते सर , रघुप्रराघ पतसंस्थेचे चेअरमन सागर खुर्पे, मुख्याध्यापक किशोर मोताळे , नवनाथ गिलबिले सर , सरपंच भागवत शेजुळ , ग्रामसेवक आनंदकुमार सिरसट , ॲड. अजित जगताप , तलाठी प्रमोद चव्हाण , पिके उद्योग समुहाचे पद्माकर कांबळे , नगर सेवक शरद यादव , पाटिल साहेब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीराम नरवडे , महसुल सेविका सौ. कौशल्याताई दत्ता कांबळे व समाज सेवक इफ्तेखार जक्की बाबा सोशल वेलफेअर फाउंडेशनचे अध्यक्ष शेख शौकत यांना जाहिर करण्यात आले असून मुकनायक दिनाचे औचित्य साधून विविध नामांकित मान्यवरांच्या उपस्थित या पुरस्काराचे वितरण सोहळ्याचे आयोजन केले असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे निर्भिड पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब आडागळे यांनी दिली आहे.
माजलगाव निर्भीड पत्रकार संघाच्या वतीने प्रतिवर्षी पत्रकारितेतील क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारांसह माजलगाव तालुक्यातील सामाजिक कार्य, रुग्न सेवा, उत्कृष्ट उद्योजक, उत्कृष्ट सहकार , आदर्श सरपंच, आदर्श तलाठी , आदर्श ग्रामसेवक, आदर्श शिक्षक, आदर्श नगरसेवक, आदर्श शैक्षणिक संस्थाचालक, आदर्श विधीतज्ञ , आदर्श महसूल सेविका,उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बीड जिल्ह्यातील व माजलगाव तालुक्याच्या मातीतील व्यक्तीस मूकनायक व माजलगाव भूषण पुरस्कार देऊन गेल्या पाच वर्षापासून सन्मानित करण्यात येते. यावर्षी या पुरस्काराचे सहावे वर्ष असून यावर्षीचे मुकनायक पुरस्काराचे मानकरी संपादक विजयकुमार वाव्हळ, ज्ञानेश्वर लंगे, अरविंद ओव्हाळ, तर माजलगाव भूषण पुरस्काराचे मानकरी विजय साळवे, (सामाजिक ) संभाजी शेजुळ (समाज भुषण ) डॉक्टर दिपक कोडगिरकर (आरोग्य सेवा) जीवन नखाते (उत्कृष्ट शिक्षण संस्था चालक) चेअरमन सागर खुर्पे (सहकार क्षेत्र) किशोर मोताळे, (आदर्श मुख्याध्यापक) नवनाथ गिलबिले (आदर्श शिक्षक) भागवत शेजुळ (आदर्श सरपंच) आनंदकुमार सिरसट (आदर्श ग्रामसेवक) अँड. अजित जगताप (उत्कृष्ट विधीज्ञ) प्रमोद चव्हाण (आदर्श तलाठी) पद्माकर कांबळे, (उत्कृष्ट व्यावसायिक ) शरद यादव (आदर्श नगरसेवक) श्रीराम नरवडे (उत्कृष्ट समाजकार्य ) कौशल्याताई लोखंडे (आदर्श महसूल सेविका) शौकत शेख समाजसेवक इप्तेखार जक्की बाबा सोशल अँड वेलफेअर फाउंडेशन (आदर्श फाउंडेशन) यांना जाहीर झाले असून मूकनायक व माजलगाव भूषण पुरस्काराचे वितरण मूकनायक दिनाचे औचित्य साधून विविध नामांकित मान्यवराच्या उपस्थित भव्य दिव्य समारंभ सोहळा लवकरच पार पडणार असल्याची माहिती माजलगाव निर्भीड पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब आडागळे, परमेश्वर सोळंके, अमर साळवे, शेख हमीद, राजरत्न डोंगरे, सिद्धेश्वर गायकवाड, संतोष रासवे, विजय कापसे, अनिकेत भिलेगावकर, विजय डावरे, दिगंबर गिरी, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप कुलकर्णी, मार्गदर्शक प्रचंड सोळंके , मुंजा गाडेकर, रामभाऊ यादव, रंजीत आडागळे, गणेश तौर, तेजस शिंदे, दत्ता जाधव, यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button