शैक्षणिक

हर्षवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापक लक्ष्मण राऊत यांना कृतिशील मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान

 

सोलापूर ( प्रतिनिधी )
उत्तर सोलापूर तालुक्यातील हिप्परगे तळे येथील श्री शिक्षण प्रसारक मंडळी, सोलापूर संचलित हर्षवर्धन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक यांना महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने माध्यमिक विभागातील मुख्याध्यापकांसाठी दिला जाणारा कृतिशील मुख्याध्यापक पुरस्कार’
मुख्याध्यापक लक्ष्मण राऊत यांना माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार वितरण सोहळा सिंहगड इन्स्टिट्यूट, केगाव येथे संपन्न झाला.मुख्याध्यापक लक्ष्मण राऊत यांनी शाळेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत समितीने त्यांना या पुरस्काराने गौरवले आहे.त्यांच्या या सन्मानासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून मुख्याध्यापक लक्ष्मण राऊत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button