पिंपरी चिंचवड ( अशोक शिवशरण )दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम यांच्या वतीने प्राचीन बुद्ध लेणी भोरगिरी तालुका खेड जिल्हा पुणे येथे आषाढ पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा वर्षावास प्रवचन मालिका उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक १० जुलै २०२५ रोजी पुणे जिल्हा पश्चिम अध्यक्ष प्रकाश ओव्हाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
याप्रसंगी पूजनीय भंते धम्मानंद यांनी आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने उपस्थित त्यांना त्रिसरण पंचशील व शुभाशीर्वाद दिले,
सदर प्रवचन मालिका उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन ऍडव्होकेट सुभाष जौंजाळे यांनी प्रवचन मालिकेचे उद्घाटन केले व आषाढ पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा व वर्षावासाचे महत्त्व या विषयावर प्रवचन देत असताना सर्वांनी तथागत गौतम बुद्धांनी दिलेल्या मार्गाचे अनुसरण करून बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेच्या माध्यमातून समाजाला समतेच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी आपल्या कार्याला गती द्यावी लागेल प्रयत्नशील राहावे असे सांगितले,याप्रसंगी पुणे जिल्हा पश्चिम कार्यकारणी उपस्थित होती,समता सैनिक दलाचे लेफ्टनंट जनरल पी एस ढोबळे ,ऑफिसर्स व सैनिक यांच्या वतीने प्राचीन बुद्ध लेणीस सलामी देण्यात आली,पुणे जिल्हा पश्चिम अंतर्गत सर्व तालुका पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला, वर्षावास प्रवचन मालिका उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने खेड तालुका संघटक गणेश भोसले यांच्या माध्यमातून अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती, सर्वांनी अल्पोपहाराचा आस्वाद घेतला. भोसले परिवारांच्या कुशल कार्याचे अभिनंदन व कौतुक केले,भारतीय बौद्ध महासभा देहूरोड शाखा अध्यक्ष प्रकाश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष सु.भा. पवळ, सचिव लक्ष्मण कांबळे व अनुकूल गायकवाड देहूरोड शाखा पर्यटन विभागाच्या वतीने ५० सीटच्या बसचे नियोजन करण्यात आले होते, देहूरोड शहर व पंचक्रोशीतील बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला धम्मभूमी देहूरोड ते भोरगिरी प्राचीन बुद्ध लेणी हा प्रवास करत असताना संस्कार उपाध्यक्ष उत्तम हिंगे संस्कार सचिव विजय गायकवाड,व महिला संस्कार उपाध्यक्ष संगीता बनसोडे यांच्यासह सर्वांनी सामुदायिकरित्या सुत्तपठन घेण्यात आले,
याप्रसंगी समता सैनिक दलाचे लेफ्टनंट जनरल पी एस ढोबळे , पुणे जिल्हा पश्चिम संरक्षण उपाध्यक्ष राजेंद्र बडेकर, संरक्षण सचिव सुजितकूमार जाधव पुणे जिल्हा पश्चिम महिला संरक्षण उपाध्यक्षा आशा गायकवाड ,देहूरोड शाखा अध्यक्षा पुष्पा कांबळे, कोषाध्यक्ष आशा माने, संस्कार उपाध्यक्षा संगिता बनसोडे,संरक्षण उपाध्यक्ष संगीता गायकवाड, प्रचार व पर्यटन उपाध्यक्षा छाया शिंदे सरचिटणीस राकेश आव्हाड, कोषाध्यक्ष मोहन शिंदे, संरक्षण सचिव आप्पासाहेब वाघमारे व परशुराम दोडमणी सह देहूरोड शहर व पंचक्रोशीतील बंधू भगिनी उपस्थित होते,सर्वांचे आभार कोषाध्यक्ष मोहन शिंदे यांनी मानले.