सामाजिक
नागरिकांच्या पादचारी मार्गावरही अतिक्रमण , नगर पालिकेची बघ्याची भुमिका

व्यवसायिकांचा पदचारी मार्गावर कब्जा
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) :- सोलापुर रस्ता ते तारामाता उद्यान रस्त्यावर दोन्ही बाजुने नागरिकांना जाण्या येण्या करिता पादचारी मार्गाची निर्मिती केली आहे . पण या पादचारी मार्गाचा वापर नागरिकाना वयोवृद्ध लोकानां मुलांना होत नाही पादचारी मार्गावर चक्क व्यापाऱ्यांनी व्यवसाय थाटली आहेत . मात्र नगर पालिकेचे याकडे जाणुन बुजुन दुर्लक्ष करीत असल्याची बाब निदर्शनास येत आहे . विजय कामगार चौक भागात पादचारी मार्ग व्यवसायिकांनी गायप केल्याचे दिसते . पादचारी मार्गावरील सर्व अतिक्रमण नगरपलिकेने निपक्षपातीपणे त्वरीत काढावीत नागरिकासाठी पादचारी मार्ग तात्काळ मोकळा करावा अशी मागणी जेष्ठ वृद्ध नागरिकांधुन व्यक्त केली जात आहे .
दिवसोदिवस अक्कलकोट तीर्थक्षेत्री मोठया प्रमाणात भाविक भक्त येत आहेत वाहनांची संख्या वाढली आहे वाहतुकीची कोंडी होत आहे .वाहतुकीस अडथळे असणारी अतिक्रमण तात्काळ दुर करणे आवश्यक आहे . नगरपालिकेने नागरिकाना येण्या जाण्यासाठी सोलापुर रस्ता ते . तारामाता उद्यान पर्यंत व विजय कामगार चौक ते कांदा बाजार रस्ता पर्यंत पादचारी मार्ग नागरिका नां जाण्या येण्यासाठी निर्माण केला आहे मात्र हया पादचारी मार्गावर चक्क व्यवसायकांनी विविध प्रकारचे व्यवसाय थाटले आहेत . विजय कामगार चौक ते कांदा बाजार रस्ता दोन्ही बाजुने पादचारी मार्गावर व्यवसायिकांनी व्यापार थाटून रहदारीस अडथळा निर्माण केला आहे पादचारी मार्गच व्यवसायिकांनी गिळंकृत केल्याचे दिसुन येते मात्र या बाबीकडे नपाचे अक्षम्य दुर्लक्ष व पक्षपाती धोरण राबविल्याचा आरोप नागरिकातून व्यक्त होत आहे . पादचारी मार्गावरील सर्व अडथळे त्वरीत काढवित . नागरिकाना वृद्धांना बालकानां रहदारीसाठी पादचारी मार्ग त्वरीत खुला करावा अशी मागणी नागरिकातुन स्वामी भक्ता मधुन व्यक्त केली जात आहे ‘ .
चौकट –
वृद्ध महिला पुरुष स्वामी भक्त लहान मुले पदचारी यात्री याना चालत जाण्यासाठी पदचारी मार्ग आहे मात्र व्यापारी चक्क दुकाने थाटली आहेत नपाचे मात्र अर्थपुर्ण दुर्लक्ष आहे.