राजकीय

पुणे येथे काँग्रेस पक्षाची पश्चिम महाराष्ट्र विभागीय आढावा बैठक

 

पुणे – पुणे येथील काँग्रेस भवनात आज AICC चे महाराष्ट्र प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष . हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्र विभागातील लोकसभा प्रभारी, जिल्हा प्रभारी, विधानसभा प्रभारी आणि जिल्हाध्यक्षांची आढावा बैठक संपन्न झाली.

या बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस संघटनेच्या सद्यस्थितीचा, संघटनात्मक कामकाजाचा आणि आगामी राजकीय वाटचालीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पक्ष संघटना तळागाळापर्यंत अधिक मजबूत करणे, प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढवणे आणि जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर आक्रमकपणे संघर्ष उभा करणे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आगामी काळात सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने आणि पूर्ण ताकदीने कामाला लागून काँग्रेसचा विचार, पक्षाची भूमिका आणि जनतेच्या प्रश्नांवरील पक्षाचा लढा अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी विधान परिषदेतील गटनेते आ. सतेज पाटील, खा. प्रणिती शिंदे, आ. विश्वजीत कदम, AICC सचिव . मोहन जोशी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा माजी मंत्री . रमेश बागवे, वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, वरिष्ठ प्रवक्ते . अतुल लोंढे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष  शिवराज मोरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस  अभिजीत सपकाळ, पुणे शहराध्यक्ष . प्रशांत जगताप आणि श्रीमती दीप्ती चौधरी, गटनेते . चंदुशेठ कदम यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button