Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

माजलगाव शहरासह तालुक्यातील मटका बंद करा !

Admin by Admin
March 13, 2025
in क्राईम
0
माजलगाव शहरासह तालुक्यातील मटका बंद करा !

Oplus_16908288

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माजलगाव पत्रकारांची पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी –

माजलगाव ( नाजेर कुरेशी ) बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचे बीड जिल्ह्यात आगमन होताच गुटखा, वाळू माफिया, गुंड यांचे धाबे दणाणले गुटखा बंद झाला वाळूची अवैध तस्करी बंद झाली आणि गुंड लपून बसले मात्र माजलगाव तालुक्यातील मटका आजही चालूच आहेत या अवैध मटक्याच्या जुगारा मुळे अनेक गोरगरीब मजूर यांचे संसार उध्वस्त होत आहेत हे पाहून माजलगाव शहरासह तालुक्यातील मटका बंद करावा अशी मागणी माजलगाव पत्रकारांच्या वतीने पोलीस अधीक्षक कावत यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .
बीड जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून अवैध धंदे वाढले होते गुंडगिरी वाढली होती या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी तरुण तडफदार पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना महाराष्ट्र सरकारने नियुक्त केले त्यांनीही आपली धडाडीची कारकीर्द दाखवत बीड जिल्ह्यातील गुटका किंग, वाळू किंग, तसेच गुडांचे आका यांच्यावर जरब निर्माण केली यामुळे कावतांची दहशत कुठेतरी फावत आहे याचे दर्शन बीड जिल्ह्याला झाले मात्र मटका जुगार राजरोसपणे माजलगाव शहरासह ग्रामीण भागात चालू आहे आपण एक रुपया लावला तर नव्वद रुपये मिळणार या आशेने मजुरी काम करणारे महिला पुरुष यामध्ये भरडले जात आहेत मटका तर लागतच नाही मात्र अशा खूप वाईट असते आज ना उद्या आपल्याला मटका लागेल या हेतूने रोजंदारी करणारे मजूर आपण दिवसभर केलेल्या कामाचे पूर्ण पैसे मटक्यावर लावत आहेत आणि दुसऱ्या दिवशी मटका न लागल्यामुळे गृहकलह करून संपूर्ण कुटुंब उपाशी झोपत आहे कावत साहेब मजुरीचे पैसे आम्हाला पुरतात मात्र माजलगाव तालुक्यातील मटका बंद व्हायला हवा अशी आरत हाक मजूर कुटुंबीयांच्या महिला पोलिसांसह, पत्रकारांना देत आहेत ही हाक ऐकून माजलगाव पत्रकारांच्या वतीने पोलीस अधीक्षक नवनीत कावत ज्यांच्याकडे निवेदन देऊन माजलगाव शहरास ग्रामीण तालुक्यातील मटका बंद करावा अशी मागणी करण्यात आली आहे याचे प्रतिलिपी निवेदन माजलगाव पोलीस ठाणे शहर, माजलगाव पोलीस ठाणे ग्रामीण यांना देण्यात आलेले आहे यावर तात्काळ कारवाई न झाल्यास तालुक्यातील जनतेच्या वतीने जनतेसह पत्रकार तीव्र आंदोलन करतील याची दक्षता पोलीस प्रशासनाने घ्यावी असा इशाराही देण्यात आलेला आहे .

Previous Post

नागरिकांच्या पादचारी मार्गावरही अतिक्रमण ,  नगर पालिकेची बघ्याची भुमिका

Next Post

अक्कलकोट आगारात 10 नवीन लालपरी दाखल

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट आगारात 10 नवीन लालपरी दाखल

अक्कलकोट आगारात 10 नवीन लालपरी दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156962
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697