टॉप न्यूज

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून राज्यातील पूरग्रस्तानां मदतीचा हात

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरचे जिल्हाधिकारी- कुमार आशीर्वाद यांच्या आवाहनानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमध्ये बाधित नागरिकांना जीवनावश्यक धान्य शिधा किट सुमारे रु. ५० लाखाचे ५ हजार नग आणि अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था, हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. अलकाताई जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व सचिवा सौ. अर्पिताराजे अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सदर संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांना मदत म्हणून १ हजार पूरग्रस्त महिलांना साड्या जिल्हा प्रशासनाला सोमवारी सायंकाळी सुपूर्त करण्यात आले. दि. १८ ऑक्टोबर पासून दिवाळी सुरु होत असून, या पार्श्वभूमीवर मंडळाकडून होणारी मदत ही अनमोल म्हणावी लागणार आहे. पैकी १ हजार धान्य कीट साड्या २०० (दोनशे) अक्कलकोट तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी देण्यात आले आहे.
दरम्यान अन्नछत्र मंडळाच्या वतीने विजयादशमी, दसरा च्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी सदरची मोठी घोषणा केल्याप्रमाणे सोमवारी तहसीलदार विनायक मगर यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमध्ये बाधित नागरिकांना जीवनावश्यक धान्य शिधा किट सुमारे रु. ५० लाखाचे ५ हजार नग आणि अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था, हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था यांचेवतीने पूरग्रस्तांना मदत म्हणून १ हजार पूरग्रस्त महिलांना साड्या यांनी भरलेले १२ ट्रक सोलापूरकडे रवाना करण्यात आले. याप्रसंगी ट्रकचे पूजन तहसीलदार विनायक मगर यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी यांच्या मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले.
चौकट-
अन्नछत्र मंडळाचे सहकार्य-
सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमध्ये बाधित नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सोलापूर जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आहावानानुसार बाधित नागरिकांना जीवनावश्यक धान्य शिधा किट सुमारे रु. ५० लाखाचे ५ हजार नग अन्नछत्र मंडळ यांचे कडून व न्यासाची सहयोगी संस्था, हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पूरग्रस्त महिलांसाठी १ हजार साडी चोळीचे पूरग्रस्ताना वाटप करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्त करण्यात आले आहे. यापैकी अक्कलकोट तालुक्याला १ हजार कीट व २०० (दोनशे) साड्या गरजूंना पोहचविल्या जातील.
विनायक मगर
तहसीलदार, अक्कलकोट
चौकट-
मदत नव्हे, आमचे कर्तव्य:-
न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नछत्र मंडळ हे धर्मादाय न्यास गेली ३८ वर्षे स्वामींचे अन्नदानाचे कार्य सातत्याने करीत सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आरोग्य, क्रिडा व पर्यावरण पुरक असे नानाविध उपक्रम सदैव राबवित असते, तसेच पूरग्रस्त, जळीतग्रस्त, भूकंपग्रस्तांना तातडीने मदतीचा हात देत असते. शासनाच्या विविध उपक्रम राबविण्यात व शासनास सहकार्य करण्यात हे धर्मादाय न्यास सदैव अग्रेसर असते.
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे अनेक तालुके बाधित झाले असून, ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी अन्नछत्र मंडळ व न्यासाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी या संस्थेकडून मदत नव्हे आमचे कर्तव्य म्हणून ५ हजार कीट व १ हजार साड्या जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्त करण्यात आले आहेत. त्यापैकी १ हजार धान्य कीट २०० (दोनशे) साड्या अक्कलकोट तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी देण्यात आले आहे.
अमोलराजे जनमेजयराजे भोसले
कार्यकारी अध्यक्ष
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट
या प्रसंगी नायब तहसीलदार संजय भंडारे, सचिव शामराव मौरे ,विश्वस्त राजेंद्र लिंबीतोटे, मनोज निकम, सौरभ मोरे, बाळासाहेब घाडगे, बाबुशा महिंद्रकर, प्रवीण देशमुख, अतिश पवार, अमित घाडगे, सुमित घाडगे, प्रवीण घाटगे, वैभव मोरे, फहीम पिरजादे, प्रसाद मोरे, रोहन शिर्के, रुद्रय्या स्वामी, गोटू माने, समर्थ बळ्ळोरगी, स्वामिनाथ बाबर, किरण साठे, शुभम सावंत, विशाल कलबुर्गी, समर्थ शिंदे, ओंकार देशमुख, योगेश पवार, दत्ता माने, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, श्रीनिवास गवंडी, लक्ष्मण बिराजदार, महांतेश स्वामी, धनप्पा उमदी, समर्थ घाटगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी, राजाभाऊ एकबोटे, संजय पडनुरे, भारत पाटील, सागर सुतार, बिरप्पा व्हनजंडे, महेश दणके, टिनू पाटील, धनंजय गडदे, निखील झगे, ओंकार अलदी, शहाजी यादव, बसवराज क्यार, पप्पू कोल्हे, संजय गोंडाळ, आकाश गडकरी, मारुती बोरकर, शेकप्पा मिनगले यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button