Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

चतुर्थ श्रेणीसाठी कोतवालांचे राज्यात बेमुदत संपाची हाक

Admin by Admin
September 22, 2024
in महाराष्ट्र
0
चतुर्थ श्रेणीसाठी कोतवालांचे राज्यात बेमुदत संपाची हाक

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
चतुर्थ श्रेणीबाबत सरकारचा दुटप्पीपणा
मागण्या मान्य न झाल्यास 26 तारखेपासून मुंबईत आझाद मैदानावर करणार आंदोलन
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
             राज्यातील कोतवालांनी चतुर्थ चा दर्जा आणि इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आक्रमक भूमिका घेतली असून मंगळवार दिनांक 24 राज्यभरात जिल्हास्तरीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 25 तारखेपासून राज्यभर काम बंद आंदोलन सुरू करण्यात येणार असून गुरुवारपासून  दि 26 पासून मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे महसूल प्रशासनातील कोतवाल महत्त्वाचे घटक आहेत मसूर गोळा करणे निवडणूक प्रक्रियेत व स्थानिक पातळीवरील नित्य नियमाची कामे पार पाडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात अशा विविध जबाबदाऱ्या पार पडत असून कोतवालाना अद्याप पर्यंत चतुर्थ श्रेणी चा दर्जा मिळाला नाही त्यामुळे त्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन आणि सुविधा मिळत नाही कोतवाल संघटनेच्या माहितीनुसार या मागण्यावर कोणतीही प्रभावी कारवाई झाली नाही त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यातील हजारो कोतवाले आंदोलनात सहभागी होणार असून आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू असणार आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष विठ्ठल गुरव यांनी दिली.
       कोतवाल हा महसूल यंत्रणेतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे मात्र कोतवालाना अद्याप चतुर्थ श्रेणी प्राप्त झालेली नाही यासाठी मंगळवारपासून सोलापूर जिल्हा कोतवाल संघटनेने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. येत्या मंगळवारी 24 रोजी जिल्हा परिषद येथील पूनम गेट येथे एकदिवशी धरणे आंदोलन त्यानंतर बुधवारी 25 पासून राज्यभरात काम बंद आंदोलन करणार असून, जर या दोन दिवसात शासनाने दाखल न घेतल्यास दि.26 पासून मुंबई येथील आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात येणार आहे. 
            कोतवाल महसूल विभागातील शेवटचा भाग आहे. तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत जाऊन प्रत्येकाच्या शंकेचे निरसन करणे, महसूल गोळा करणे, गौणखनीज आळा बसविणे, निवडणूक कामकाज, नैसर्गिक आपत्ती, पीक पाणी, दुष्काळात नुकसान भरपाई, पंचनामाचे सर्वेक्षण, करणे स्थानिक पातळीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी पोलीस पाटील व पोलीस प्रशासनास मदत करणे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांना सहाय्य करणे अशा अनेक कामकाजात कोतवाल हा अत्यंत महत्त्वाचा घटक समजला जातो. मात्र, हा कोतवाल साठ वर्षापासून चतुर्थ श्रेणीसाठी सतत झगडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महसूल मंत्री यांनी तातडीने बैठक घेऊन कोतवालांचा विषय निघाली काढावा अन्यथा होणाऱ्या नुकसान राज्य शासन स्वतः जबाबदार राहणार आहे. त्यामुळे तातडीने बैठक घेऊन गेल्या पन्नास वर्षांपासून च्या मागणीचा निर्णय व्हावा अशी मागणी सध्या जोरदार आहे.
            या आंदोलन यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष विठ्ठल गुरव, अनिल जाधव सरचिटणीस, मलिनाथ बाळगी राहुल तोडकरी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रविणकुमार बाबर, भगवान पारशी, समाधान सुरयंगध, गौतम ठोकळे  धानया स्वामी, अवधूत पुजारी, शफीक वाडीकर, राजेंद्र कुंभार  इरणा कांबळे, कृष्णा शिंदे, बाळासाहेब सरवदे, बालाजी वहळे, बंडु मडवळकर, शहाजी हुगंगे, इतर पदाधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील 547 कोतवाल हे आंदोलनात सहभागी होणार आहेत अशी माहिती जिल्हाध्यक्ष विठ्ठल गुरव यांनी दिली.
Previous Post

बंगळुरू मध्ये ऐका २९ वर्षिय महिलेची हत्या करून तीचे २० तुकडे फ्रिजमध्ये ठेवण्यात आले

Next Post

भाजप नेहमीप्रमाणे खोटी माहिती पसरवत आहे -: राहल गांधी

Admin

Admin

Next Post
भाजप नेहमीप्रमाणे खोटी माहिती पसरवत आहे -: राहल गांधी

भाजप नेहमीप्रमाणे खोटी माहिती पसरवत आहे -: राहल गांधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697