अक्कलकोट (स्वामीराव गायकवाड ) अक्कलकोट तीर्थक्षेत्री महाराष्ट्रासह देशभरातून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी अक्कलकोट बसस्थानकाच्या पुनर्निर्माणाचे काम प्रगतीपथावर आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नामुळे अक्कलकोट बस स्थानकाच्या कामास गती आली असून २९ कोटी रुपयांचें हे बसस्थानक अक्कलकोटच्या वैभवात भर टाकणारे असणार आहे.
तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत बसस्थानक हे पुनर्निर्माणाच्या प्रतीक्षेत होते. जुन्या बसस्थानकात सुविधांचा अभाव होता. अक्कलकोट तालुकावासीय व परगावच्या लाखो भाविक भक्तांची भव्य बसस्थानक बांधण्याची मागणी होती. अक्कलकोट बसस्थानकाची अवस्था अत्यंत बिकट होती. मोडकळीस आलेली इमारत ‘ घाणीचे साम्राज्य अतिक्रमणाचा विळखा , स्वच्छतागृहांचा अभाव मोकाट जनावरांचा वावर यामुळे बसस्थानक हे बकाल बनले होते. गेल्या वीस-पंचवीस वर्षापासून बसस्थानक बदलाच्या प्रतीक्षेत होते .आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी महायुती सरकारच्या काळात पाठपुरावा करून सुमारे २९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अक्कलकोट बसस्थानकाच्या पुनर्निर्माणाचे भूमिपूजन करण्यात आले. सदरच्या नवीन बस स्थानकात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अक्कलकोटचे नूतन बसस्थानक हे तीन मजली आहे. दोन चाकी वाहन , रिक्षा आणि चार चाकी वाहनांसाठी स्वतंत्र वाहन तळ , ११ मोठे व्यापारी गाळे ,भक्तनिवास , आरक्षण कक्ष शिवनेरी शिवशाही शिवाई अशा बसेससाठी स्वतंत्र प्रतीक्षालय ,वाहक चालक विश्रांती कक्ष, हिरकणी कक्ष, स्वतंत्र महिला वाहक विश्रांती कक्ष ,अत्याधुनिक स्वच्छतागृहे , सर्व सोयीने युक्त कॅन्टीन ,कर्मचारी अधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष, बसेस साठी एकूण २२ फलाट असे वैशिष्ट्य नवीन बसस्थानकाचे असणार आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्यामुळे तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत बस स्थानकाची भव्य अशी वास्तू साकारत आहे. या नवीन बसस्थानकाच्या निर्मितीस वेग आला असून पुनर्निर्माणाचे काम प्रगतीपथावर आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या कार्यकाळात निर्माण होणारे बसस्थानक हे नक्कीच अक्कलकोटच्या सौंदर्यात भर घालणारे आहे. नवीन बस स्थानकाच्या निर्माणामुळे परगावच्या लाखो भाविक भक्तांसह अक्कलकोट तालुका वासियांसह सीमावर्ती भागातील प्रवाशांची सोय होणार आहे. या बस स्थानकाच्या निर्माण बद्दल सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.Oplus_131072