सामाजिक

शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे नूतन पदाधिकारी  हेगडे व हावनूर यांचा सत्कार

अक्कलकोट ( प्रतिनिधी )

शिवसेना बांधकाम कामगार सेना महाराष्ट्र राज्य शिवसेना सोलापूर जिल्हा बांधकाम कामगार जिल्हा उपाध्यक्षपदी स्वामीनाथ हेगडे , बांधकाम कामगार सोलापूर जिल्हा संघटक पदी वैशाली  हावनूर यांची निवड  झाल्याबद्दल  महाराष्ट्र राज्य  पत्रकार संघाच्या वतीने व पत्रकार  यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. शिवसेना कामगार संघटना सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष स्वामीनाथ हेगडे शिवसेना बांधकाम कामगार संघटना जिल्हा संघटक पदी वैशाली  हावनूर यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य   पत्रकार संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य  स्वामीराव गायकवाड , माजी तालुकाध्यक्ष राजेश जगताप , पदाधिकारी रमेश भंडारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्हा संघटक वैशाली  हावनूर यांनी सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचे काही प्रश्न असतील त्यांचे सर्व काही समस्या सोडवण्यात येतील. बांधकाम कामगारांचे सभासद करून त्यांचे कामे मार्गी लावणार.  बांधकाम कामगारांना योग्य न्याय मिळवून देऊ असे सांगितले. यावेळी कामगार सेना अक्कलकोट शहर उपाध्यक्ष आकाश बबलाद व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button