धार्मिक
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात शंकर उवाच “रामायण” सजीव हलता देखाव्याचे शानदार उद्घाटन सोहळा

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट श्री तुळजाभवानी माता शारदीय नवरात्र महोत्सव – २०२६ श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या परिसरात असलेल्या श्री तुळजाभवानी माता मंदिर येथे श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव -२०२६ चे आयोजन करण्यात आले असून, रविवार सायंकाळी शंकर उवाच “रामायण” सजीव हलता देखाव्याचे शानदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
*दरम्यान श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मंडळाने यंदाही न्यासाच्या परिसरात असलेल्या श्री तुळजाभवानी माता मंदिर येथे श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव -२०२६ चे आयोजन करण्यात आले असून, रविवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वा. शंकर उवाच “रामायण” सजीव हलता देखाव्याचे शानदार उद्घाटन सोहळा आमदार सचिन कल्याणशेट्टी व नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते व मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि प.पु.वे.शा.सं.श्री.मोहन गोविंदराव पुजारी मुख्य पुरोहित श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान यांच्या दिव्य सानिध्यात व अक्कलकोट नगरपरिषदेचे सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. आई राजा उदो उदो…! सदानंदाचा उदो उदो…!, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त…! श्री स्वामी समर्थ महाराज कि, जय…! च्या जय घोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
श्री तुळजाभवानी माता मंदिरात महापूजा, आरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रम हा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली .वे.शा.सं..मोहन गोविंदराव पुजारी मुख्य पुरोहित श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान यांच्या दिव्य सानिध्यात तर श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष व जेष्ठ नगरसेवक महेश इंगळे, उपनगराध्यक्ष ऋतूराज उर्फ बंटी राठोड, प्रथमेश इंगळे,हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, नगरसेवक भीमराव तथा तम्मा शेळके, माजी नगरसेवक सुनिल सिद्धे,न.प.आरोग्य सभापती- अविनाश मडीखांबे, गट नेते- यशवंत तात्या धोंगडे, महेश हिंडोळे,नागराज कुंभार, श्रीमती कस्तुराबाई चौगुले, लक्ष्मीकांत धनशेट्टी, रमेश कापसे, शिक्षण सभापती- अपर्णाताई सिद्धे, नाविद डांगे, अमृताताई शिंदे, शैलाताई स्वामी, स्नेहाताई खवळे, सद्दामहुसेन शेरीकर, सोनालीताई शिंदे, पाणी पुरवठा सभापती- देविदास कवटगी, सुनंदाताई स्वामी, मंजनाताई कामनुरकर, नन्नु कोरबू, सरिताताई कुरले, प्रवीण शहा, संजय घोडके, अशोक जाधव, या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.
सदर देखावा हा विजयादशमी पर्यंत सर्व देवी भक्त व शहर वाशीयांसाठी असणार आहे. तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावेत असे आवाहन संस्थेचे सचिव शामराव मोरे यांनी केले आहेत.
या प्रसंगी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, संतोष भोसले, अभिजित लोकापुरे, मनोज निकम, अरविंद शिंदे,रामचंद्रराव घाटगे, बाबुशा महिंद्रकर,बाळासाहेब शिंदे,बाळासाहेब शिंदे,नितीन शिंदे, संजय गोंडाळ, खंडेराया शिंदे, सौरभ मोरे, रोहित खोबरे, सिद्धेश्वर मोरे, किरण पाटील, शरणप्पा कापसे, निखिल पाटील, , रोहन शिर्के, शुभम सावंत, अतिश पवार, बाळासाहेब पोळ, गोटू माने, योगेश पवार, सरफराज शेख, मैनुद्दीन कोरबू, अनिल कुर्ले, अशपाक काझी, अप्पा हंचाटे, शरद भोसले, प्रसाद हुल्ले, तानाजी पाटील, राजू पवार, महांतेश स्वामी, रवी वाघमोडे, धनंजय गाढवे, ,प्रीतेश किलजे यांच्यासह या कार्यक्रमास समस्त विश्वस्त मंडळ, क्रियाशील सदस्य, कार्यकर्ते, व सेवेकरी, अन्नछत्र मंडळाची सहयोगी, हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था, अमोलराजे लेझीम संघ, अमोलराजे भोसले मित्र परिवार आदीजन उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक, सूत्रसंचालन- श्वेता हुल्ले यांनी केले.



