शैक्षणिक

फिनोलेक्स व मुकुल माधव फाउंडेशनच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात 500 वृक्षांची लागवड

 

करमाळा ( आयुुब शेख ) येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये फिनोलेक्स व मुकुलमाधव फाउंडेशनच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या परिसरामध्ये 500 वृक्षांची लागवड करण्यात आली.करमाळा शहरातून वृक्ष लागवडीची जनजागृती करत वृक्षदिंडी
काढण्यात आली.या वृक्षदिंडीसाठी कोर्टी येथील ह.भ.प. मच्छिंद्र अंभग महाराज यांच्या वारकरी शिक्षण संस्थेचे योगदान लाभले. पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या परिसरामध्ये एक विद्यार्थी एक झाड या संकल्पनेवर आधारित या उपक्रमांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्या विकास मंडळाचे सचिव यशवंत परिवाराचे आधारस्तंभ  विलासराव घुमरे  , संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी. पाटील मुकुल माधव फाउंडेशन चे संतोष शेलार करमाळा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीजा मस्के पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ढोरे साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी
मा. विलासरावजी घुमरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की वृक्षारोपण हा केवळ एक सरकारी उपक्रम नसून आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. वाढते प्रदूषण आणि जागतिक तापमान ही आपल्यासमोर मोठी आव्हाने आहेत आणि त्यावर मात करण्यासाठी अधिकाधिक झाडे लावणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे. विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडांची काळजी घेणे आणि भविष्यात अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आव्हान त्यांनी केले.
या उपक्रमात कडूनिंब, चिंच , वड, पिंपळ, आंबा व जांभूळ यासारख्या विविध प्रकारच्या देशी झाडांची लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वतः खड्डे खोदले आणि झाडांची लागवड केली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . एल . बी .पाटील यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व त्यांची निगा कशी राखावी आणि पर्यावरणचे संरक्षण आपण काय करू शकतो याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक , करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री. ढोरे साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीजा मस्के मॅडम करमाळा शिवशक्ती इरिगेटर करमाळाचे प्रोप्रायटर शिवाजी उद्धव सरडे,करमाळा नगरपालिकेचे कर्मचारी विपुल पुजारी ,अश्विनी जाधव ,शितल बहाड , अजित पवार ,किरण दुर्गुडे ह.भ.प. मच्छिंद्र आप्पा अभंग, मृदंगाचार्य विजय अभंग महाराज, पाणी फाउंडेशनचे तालुकाप्रमुख आशिष लाड, प्रतीक गुरव, गौंडरे येथील वसुंधरा परिवाराचे विजय खंडागळे, फिसरे येथील कृषी योद्धा शेतकरी गटाचे विजय अवताडे , मेजर सुनील दौंडे, दत्तात्रय रोकडे, नवनाथ वाघ, राष्ट्रीय सेवा योजना+2 स्तरचे स्वयंसेवक , एन.सी.सी. कॅडेट व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येनेउपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button