राजकीय
खासदार प्रणिती शिंदे यांचा अक्कलकोट तालुक्यातील शावळ आणि आंदेवाडी गावभेट दौरा

ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत विकासकामांसाठी निधी व पाठपुराव्याची ग्वाही
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट तालुक्यातील शावळ आणि आंदेवाडी येथे सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी गावभेट दौरा करून ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी विविध विकासकामे व मूलभूत सुविधांसंदर्भातील मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या.
ग्रामस्थांनी ज्ञानसिंधू मठ सभामंडप, घुंगरेगाव ते मंगरूळ रस्ता, पाणमंगरूळ ते घुंगरेगाव रस्ता, आंदेवाडी खुर्द ते आंदेवाडी बुद्रुक ब्रीज, होसूर रस्ता, मल्लिकार्जुन बिरदेव मंदिर सभामंडप, कल्लहिप्परगे ते शावळ रस्ता आदी कामांसह आंदेवाडी गाव गायरान जमिनीवर स्थलांतरित झाल्यामुळे घरकुलासह विविध शासकीय योजनांना मंजुरी मिळत नसल्याचा प्रश्न उपस्थित करून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली.
ग्रामस्थांशी संवाद साधताना खासदार प्रणिती शिंदे यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. नागरिकांनी मांडलेल्या विविध प्रश्नांचा पाठपुरावा करून संबंधित विकासकामे मार्गी लावण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी ज्ञानसिंधू मठ सभामंडपासाठी निधी देण्याची घोषणा केली. तसेच गावातील प्रलंबित प्रश्न आणि नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून विकासकामांना गती देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले. गावकऱ्यांनी व्यक्त केलेला विश्वास आणि आत्मीयता ही विकासासाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी ज्ञानसिंधू महाराज, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, सरपंच सोमलिंग तानदंडी, सरपंच सोमलिंग कलशेट्टी, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, मल्लिकार्जुन नागशेट्टी, नागनाथ लोणी, बिरू माळगे, बिरू पुजारी, भरमण्णा पुजारी, इराण्णा कुंभार, नागनाथ बिराजदार, शिवानंद पाटील, सुरेश कलशेट्टी, माळप्पा पुजारी, श्रीमंत येळमेळी, बसवराज पुजारी, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



