सोलापूर

मुख्यमंत्री समृद्ध अभियानामुळे उंदरगावात घरघरात फुलल्या परसबागा

करमाळा ( प्रतिनिधी )करमाळा येथील उंदरगाव या गावाने समृद्ध पंचायतराज मध्ये सहभाग घेतला असून या सहभातांर्गत प्रत्येक घराच्या सभोवताली ग्रामस्थांनी लोकसहभागातून परसबाग फुलवल्या आहेत .गावातील पालेभाज्यांची गरज या परसबागेमधून भागवली जात आहे आणि या पालेभाज्या संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने तयार केल्या जात आहे या परसबांगांचे कुतूहल आसपासच्या गावातील लोकांमध्येही झालेले आहे व अनेक सभोवतालच्या भागातील ग्रामस्थ उंदरगाव मध्ये चालवल्या जाणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भेट देऊन उदंरगावांमधील या उपक्रमाची माहिती घेत आहे .अशी माहिती उंदरगावचे सरपंच श्री.युवराज मगर व उपसरपंच सौ.प्रभावती रामहरी गरदडे,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ,ग्रामविकास अधिकारी श्री .यशवंत कुदळे यांनी दिली आहे . तसेच या गावांमध्ये ५०पेक्षा जास्त कुटुंबाने आपल्या घराशेजारी परसबाग करण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच फळझाडांची ही लागवड मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे संपूर्ण गाव हिरवेगार कोकणासारखे फुललेले आहे त्यामुळे संपूर्ण ग्रामस्थांमध्ये या अभियानाच्या माध्यमातून नवचैतन्य निर्माण झालेली आहे व ग्रामपंचायतीकडून राबवले जाणारे नाविन्यपूर्ण उपक्रम पाहून ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत आहे यासाठी या गावाला यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तरचे स्वयंसेवक सहकार्य करत आहे . उंदरगावचा आदर्श महाराष्ट्रातील इतर गावांनी घेण्याजोगा आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button