महाराष्ट्र

नाफेड व प्रोडूसर कंपनीच्या मार्फत सर्व शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी सरकार करेल -बालाजी बच्चेवार

घुंगराळा येथे सोयाबीन ऑनलाइन खरेदी केंद्राचा शुभारंभ संपन्न
नायगाव / नांदेड :- (सय्यद अजिम नरसीकर )

घुंगराळा ता.नायगाव येथे *पांडुरंग मेलफदवार,व अनिल सुंकेवार* यांच्या *सुंकेवार फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या सोयाबीन ऑनलाइन खरेदी केंद्राचे उद्घाटन भाजपा नेते बालाजीराव बच्चेवार* यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे *प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील* यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रमात करण्यात आले.
सदरील ऑनलाईन खरेदी केंद्र हे नाफेड व कृषी पणन मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असून या खरेदी केंद्रामार्फत शेतकऱ्यांकडून सोयाबीन ऑनलाईन करून खरेदी करण्यात येणार आहे यंदा शासनाच्या 5328 रुपये या हमीभावाप्रमाणे सोयाबीन खरेदी या केंद्रामार्फत होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक बालाजीराव बच्चेवार यांनी उदघाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करून सुंकेवार फार्मर कंपनी चे कौतुक करून यापुढेही या कंपनीने शेतकऱ्यांसाठी असे विविध उपक्रम राबवावेत आमच्याकडून जी काही मदत व सहकार्य लागेल ते करू असे सांगितले व या खरेदी केंद्राचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव मिळाला पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून नाफेड मार्फत ही खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत शेवटच्या शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा असे राज्याचे व केंद्राचे धोरण आहे शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून केंद्रात आणि राज्यातलं सरकार काम करत आहे असेही यावेळी बोलताना भाजपाने ते बालाजी बच्चेवार यांनी सांगितले .
गेल्यावर्षी या कंपनीने 53000 क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांकडून खरेदी करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला होता.व गतवर्षीच्या हमीभावाप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे मिळवून दिले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.उपसरपंच शिवाजी पा.ढगे यांनी केले.
यावेळी घुंगराळा सोसायटी चे चेअरमन श्यामराव यमलवाड,घुंगराळ्याचे सरपंच प्रतिनिधी गोविंदराव पांचाळ,मा. विस्तार अधिकारी बालाजीराव मातावाड, नागोराव दंडेवाड,मा.कृषी अधिकारी टी. जी. सुगावे,गजानन पा.जाधव कृष्णरकर,रुई चे मा. सरपंच गजानन पा.शिंदे,बालाजीराव वंगरवार,साईनाथ चन्नावार,पंडीत पा.सुगावे,भगवान मा. पा.सुगावे,बालाजीराव तुरटवाड,लक्ष्मण चन्नावार,अशोक पा. जाधव,तंटामुक्ती अध्यक्ष श्यामसुंदर पा.ढगे ,शालेय समिती अध्यक्ष माधव पा.ढगे,ज्ञानेश्वर पा.मरवाळे यांच्यासह वंजारवाडी, सावरखेड,रुई,कृष्णर,सोमठाणा, गंगणबीड,नरंगल,हिप्परगा, पाटोदा,आंतरगाव या गावातील शेतकऱ्यांसह अनेक शेतकरी, गावकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू आलेगटलेवार,पंढरी संदपणवार,माधवराव जलदेवार, विलास पा. सुगावे, गजानन जलदेवार यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button