अक्कलकोट (- प्रतिनिधी )
श्री संत सेना महाराज नाभिक समाज बहुउद्देशीय संस्था अक्कलकोट शहर व तालुका संचलित श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साह साजरी करण्यात आली.
अक्कलकोट शहर अध्यक्ष लक्ष्मण विभुते यांच्या सुविद्य पत्नी अहिल्या विभुते यांच्या हस्ते संत सेना महाराजांना अभिषेक करण्यात आले. सायंकाळी पाच वाजता गोरज मुहूर्तावर नाभिक समाजातील राहुल भाले आणि समर्थ विभूते या नवदांपत्यांच्या हस्ते श्री संत सेना महाराजांची स्थापना करण्यात आली. अक्कलकोट भजनी भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडला. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले , श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांच्या उपस्थितीत भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले .त्याच बरोबर दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी आपल्या नगरसेवक यशवंत धोंगडे , उपनगराध्यक्ष ऋतुराज बंटी राठोड, श्री स्वामी समर्थ मंदिराचे अध्यक्ष महेश इंगळे यांचे चिरंजीव प्रथमेश इंगळे, आरोग्य सभापती अविनाश मडीखांबे , नागराज कुंभार , नन्नू कोरबू , इरफान कोरबु , नगरसेवक देविदास कवटगी , योगेश पवार, आबा सोमोशी, उद्योगपती निळकंठ हिंडोळे समर्थ नगर ग्रामपंचायत सरपंच प्रदीप पाटील, रमेश सोडगी, रमेश पुजारी, सचिन नंदिकोले, लिंगायत न्हावी अध्यक्ष मारुती भाले, यांच्या समवेत गुलालाचा कार्यक्रम पार पडला.
जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांचा सत्कार उत्सव समितीचे अध्यक्ष चिचोलप्पा विभुते, अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांचा सत्कार उत्सव समितीचे उपाध्यक्ष लखन चिकले, येशवंत तात्या धोंगडे माजी उपनगराध्यक्ष आजी नगरसेवक यांचा सत्कार उत्सव समिती अध्यक्ष चिचोलप्पा विभुते, उपनगराध्यक्ष बंटी राठोड यांचा सत्कार लखन चिकले, त्याचप्रमाणे नगरसेवक अविनाश मडिखांबे, नन्नू कोरबू, देविदास कवटगी, योगेश पवार, प्रदीप पाटील, इरफान कोरबु, निळकंठ हिंडोळे , रमेश सोडगी, आदी मान्यवरांची नाभिक समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आले.
यावेळी अक्कलकोट नाभिक समाजाचे बहुउद्देशीय संस्थेचे चेअरमन सुदर्शन विभुते त्याचप्रमाणे अक्कलकोट शहर नाभिक समाजाचे शहराध्यक्ष लक्ष्मण विभुते उपाध्यक्ष राजेश कोरे , प्रविण राऊत प्रभाकर सुरवसे, महेश घाटे मार्गदर्शक पंच पद्माकर डिगे, श्रीकांत विभुते, सोमनाथ सुरवसे, उपाध्यक्ष भागवत विभुते, श्री राजेंद्र सुरवसे, अमोल सुरवसे, तेजस विभुते, नाभिक समाजाचे तालुकाध्यक्ष शिवशरण सुरवसे, प्रतिक विभुते ,युवक तालुका अध्यक्ष श्रीशैल सुरवसे , बाळासाहेब कोरे महिला तालुका अध्यक्षा श्रीमती सुरवसेताई, युवक अध्यक्षा.भाग्यश्रीताई काळे , प्रभाकर सुरवसे, सुमित डिग्गे, मोहन विभुते, सचिन विभुते, सचिन सुरवसे, अमर सुरवसे, शुभम विभुते, सोनल सुरवसे, अनिल कोरे, सुनील कोरे, महेश सुरवसे, संदिप राऊत, संस्थापक अध्यक्ष नरसिंग क्षीरसागर, अनिल सुरवसे आदींसह नाभिक समाजातील बहुसंखेनी नागरिक माता भगिनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष सुरवसे यांनी केले.आभार
अक्कलकोट तालुका अध्यक्ष शिवशरण सुरवसे यांनी मानले.







