राजकीय

आ. प्रकाश सोळंके यांना राजकिय निवृत्तीचा अधिकार कुणी दिला

राहिलेले विकास कामे पूर्ण करून खुशाल निवृत्ती घ्या !

आ. प्रकाश सोळंके यांनीच निवडणूक लढवावी , मतदार संघातील कार्यकर्त्यांची मागणी –

माजलगाव : ( परमेश्वर सोळंके ) जवळपास मागिल तीस ते पस्तिस वर्षा पासून आमदार प्रकाश सोळंके हे माजलगाव विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक विकास कामे करून दाखवली तर काही महत्वकांक्षी कामे नियोजित आहेत. त्या मुळे ही कामे केवळ आणि केवळ आमदार प्रकाश सोळंके शिवाय दुसरा कोणीही करू शकणार नाही हे सर्व मतदारसंघातील लोकांना माहीत आहे. दादा आपण बोलताना नेहमी सांगता की मी माझ्या कार्यकर्त्यांना विचारल्या शिवाय कुठलेच निर्णय घेत नाही मग तुम्हाला राजकारणातून निवृत्त होण्याचा अधिकार कुणी दिला ! असा सवाल करत येणारी विधानसभा निवडणूक हि आपणच लढवावी असा सूर सद्या मतदारसंघात पहावयास मिळत आहे.
आमदार प्रकाश सोळंके यांनी गेली महिन्याभरापासून संपूर्ण मतदार संघात ‘ संवाद जनतेशी , संवाद कार्यकर्त्यांशी , आमदार आपल्या दारी ‘ मोहीम सुरु केली आहे या दरम्यान आमदार सोळंके हे प्रत्येक गावात , वाडी – वस्त्यावर जाऊन लोकांच्या समस्या जातीने ऐकून घेत आहेत.
” दरम्यान त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आणि संपूर्ण मतदारसंघ स्तब्ध झाला ” तालुक्यातील माळेवाडी (सुलतान पूर ) येथे आपल्या वयाचे कारण पुढं करत आपली राजकीय निवृत्ती जाहीर करून आपले पुतणे आणि लोकनेते सुंदराराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन जयसिंह धैर्यशील सोळंके यांना आपला राजकीय वारस जाहीर केले मात्र मतदारसंघातिला जुन्या जाणकार लोकांना आमदार प्रकाश सोळंके यांचा हा निर्णय चुकीचा वाटला ! कारण ज्या आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यांच्या तीस वर्षाच्या राजकिय कार्यकाळात ( एक टर्म आर टी देशमुख वगळता ) या मतदारसंघात क्रांती घडवून आणली हे सर्वांना माहीत आहे. यात लोणी सावंगी जल उपसा योजना , गोदारी नदीवरील बंधारे , एम आय डी सी , माजलगाव येथील नगरपालिका इमारत , सोन्नाखोटा येथील कुंडलिका जल प्रकल्प , पैठण कॅनाल दुरुस्ती , गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी शासकीय आय टी आय सेंटर, पुनर्वसन गावातील रस्ते नाल्या , शेती पोच रस्ते , नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी येथील महाविद्यालया मध्ये भव्य असा ट्रॅक , माजलगावात पहिली उच्च शिक्षित इंग्लिश स्कुल , अनेक शासकीय कार्यालयाच्या इमारती, नवीन मोंढा आदी सह शेकडो विकास कामं त्यांनी पूर्ण करून दाखवली तर माजलगावच्या वैभवात भर टाकणारे भव्य असे क्रीडांगण , महिला रुग्णालय , नाट्यगृह , उप जिल्हा रुग्णालय आदी कामे सुरू आहेत नेहमी कार्यशील असणारे आमदार सोळंके यांनी या मतदारसंघात असं एक ही गाव नाही जिथे त्यांनी काम केलं नाही निवडणूकिच्या वेळी राजकारण आणि पुन्हा फक्त समाज कारण करणारे आमदार प्रकाश सोळंके आहेत हे खुद्द मागचे बी जे पी चे आमदार आर. टी. देशमुख यांनी मान्य केलं आहे. त्यांनी बाजार समितीच्या निवडणूक वेळी बोलताना संगीतले होते की प्रकाशदादा बरोबर असले तर विकास होतो नाही तर बुक्का लागतो या वरून आमदार सोळंके यांचे काम बोलते हे सिद्ध होते.
आमदार प्रकाश सोळंके हे नेहमी आपल्या कार्यकर्त्यांना विचारात घेऊन निर्णय घेत असतात मात्र जो त्यांनी राजकारनातील निवृत्तीचा निर्णय घेतला आहे तो खूप घाईघाईने घेतला आहे त्या मुळे कार्यकर्त्यांत नाराजी पसरली आहे दादा हा राजकीय निवृत्तीचा अधिकार तुम्हाला कुणी दिला ! असं गावागावांतील कार्यकर्ते बोलत आहेत .
माजलगाव मतदारसंघातील बऱ्याच गावांमध्ये अनेक विकास कामे सुरू आहेत आणि बरीच कामे नियोजित आहेत हे सर्व कामे पूर्ण करायची असतील तर अठरा पगड जाती धर्माला सोबत घेऊन चालणारे आमदार प्रकाश सोळंके यांच्या शिवाय पर्याय नाही ! हे अगदी शंभर टक्के खरं आहे.
जर या मतदारसंघाचे नेतृत्व कोणत्याही ऐऱ्या गैऱ्या नथ्थु खैऱ्याचा हातात गेलं तर मग हा मतदारसंघ विकासापासून कोसो दूर जाईल असं जुन्या जाणकार लोकांचे म्हणणे आहे. त्या मुळे येणारी विधानसभा निवडणूक आपणच लढवावी आणि नंतर आपण खुशाल राजकीय निवृत्ती जाहीर करावी असं हजारो कार्यकर्त्यांच म्हणणं आहे त्या मुळे दादा आपण आपल्या कार्यकर्त्यांचा मतदारांच्या मनाचा आदर ठेऊन ही विधानसभा निवडणूक लढवावी हीच एकमेव अपेक्षा !
सन्माननीय आमदार प्रकाश सोळंके यांना एकतर्फी निर्णय जाहीर करण्याचा अधिकार नाही. दादा यांना गेल्या चाळीस वर्षांपासून अनेक कार्यकर्ते , मतदार , हितचिंतक यांनी निस्वार्थ साथ दिली त्यामुळे कोणाला फायदा तर कोणाला नुकसान झाले हे सगळे तुमच्यावर असलेल्या प्रेमा पोटी. दादा आपण नेहमीच जनमताचा आदर केला आहे पण यावेळी तुम्ही एकतर्फी निर्णय घेतला तो वापस घेऊन नव्याने जनमत घेऊन जनमताचा कौल मान्य करायला हवा –
एक निःपक्ष कार्यकर्ता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button