राजकीय
सोलापूर डीसीसी बँकेच्या चेअरमन पदी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची वर्णी लागणार ?

सोलापूर जिल्ह्या सह अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात चर्चेला उधाण !
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सध्या पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे .या निवडणुकीत भाजप प्रणित पॅनलने दहा जागा या अविरोध जिंकल्या आहेत. त्यामुळे या बँकेवर आता भाजपा प्रणित पॅनलचे वर्चस्व असणार आहे. सोलापूर डीसीसी बँकेच्या चेअरमन पदी कोणाची वर्णी लागणार याकडे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सोलापूर डीसीसी बँकेच्या चेअरमन पदी अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सोलापूर जिल्ह्यासह अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची डीसीसी बँकेच्या चेअरमन पदी वर्णी लागणार याबाबतची चर्चा रंगली असून आता डीसीसी बँकेच्या चेअरमन पदी आमदार सचिन कल्याणशेट्टी विराजमान होणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सध्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक सुरू असून या निवडणुकीत भाजपा प्रणित पॅनल व महाविकास आघाडी पॅनलमध्ये निवडणूक होत आहे. सोलापूर डीसीसी बँकेच्या निवडणुकीत भाजपा प्रणित पॅनलने दहा जागा अविरोध जिंकल्या असून आता नऊ जागांसाठी निवडणूक होत आहे. सोलापूर डीसीसी बँकेच्या निवडणुकीत भाजपा प्रणित पॅनलचे वर्चस्व राहणार असून सर्वाधिक जागा या पॅनलला मिळणार आहेत असे एकूण चित्र दिसत आहे. सोलापूर डीसीसी बँकेवर भाजपा प्रणित पॅनलचे वर्चस्व राहणार असून आता डीसीसी चा चेअरमन कोण होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन पदासाठी अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन कल्याणशेट्टी तसेच पंढरपूरचे नेते ,माजी आमदार प्रशांत परिचारक व आमदार राजेंद्र राऊत यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. पण सर्वात जास्त चर्चा ही अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नावाची सुरू आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी हे सोसायटी मतदार संघातून बिनविरोध विजयी झाले आहेत. तसेच त्यांचे राजकीय वजन पाहता आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची डीसीसी बँकेचे चेअरमन पदी वर्णी लागण्याची शक्यता जास्त वाटत आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी हे भारतीय जनता पार्टीचे हुकमी एक्का असून सध्या त्यांच्यावर भाजपाची मोठी जबाबदारी आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी म्हणून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे पाहण्यात येते. त्यामुळे साहजिकच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नावाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे .तसेच पंढरपूरचे सहकार क्षेत्रातील नेते प्रशांत परिचारक यांचीही चर्चा सुरू असून त्यांची चेअरमन पदी वर्णी लागणार का हा येणारा काळच ठरवेल. आमदार राजेंद्र राऊत यांचीही चर्चा सुरू आहे .अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे सोलापूर जिल्ह्यात वाढलेली राजकीय ताकद ही त्यांना बळ देणारी ठरली आहे. सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते यांच्याशी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जवळचे संबंध निर्माण केले असून याचा फायदा त्यांना डीसीसी बँकेमध्ये होणार आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी हे समन्वय साधून राजकारण करणारे नेते म्हणून ओळखले जातात. ज्येष्ठ नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध असल्याने डीसीसी बँकेच्या चेअरमन पदी त्यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याकारणाने त्यांच्यावर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाची पूर्ण भिस्त अवलंबून आहे. भारतीय जनता पार्टीला बळ देणारा युवा नेता म्हणून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे भाजपाचे वरिष्ठ नेते पाहत आहेत. त्यामुळे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन पदी वर्णी लागण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची डीसीसी बँकेच्या चेअरमन पदी वर्णी लागल्यास शेतकऱ्यांची कामेही तातडीने होणार असून एक जनसामान्यांमध्ये मिसळणारा नेता म्हणून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे पाहण्यात येते.सर्वसामान्य नागरिकांशी थेट संबंध असणारा नेता अशी ओळख आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी निर्माण केली असून हीच ओळख त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये तारणारी ठरली आहे. याचाच फायदा हा डीसीसी बँकेच्या निवडणुकीतही झाला असून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची सोसायटी मतदारसंघातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे सहकार क्षेत्रात वाढलेले वजन पाहता सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन पदी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता राजकीय क्षेत्रात व्यक्त केली जात आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणता निर्णय डीसीसी बँकेच्या चेअरमन पदाबाबत कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सोलापूर डीसीसी बँकेचा चेअरमन ठरवणार आहेत असे सर्वत्र बोलले जात आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कोणते नाव डीसीसीच्या चेअरमन पदाबाबत येणार आहे याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
डीसीसी बँकेच्या चेअरमन पदी कोणाची वर्णी लागणार याकडे सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागले आहे.डीसीसी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरच डीसीसी बँकेच्या चेअरमन पदी कोण विराजमान होणार आहे हे चित्र स्पष्ट होणार आहे.



