सर्व ग्रामपंचायत शासकीय कार्यालयामध्ये दिव्यांग दिन साजरा करावा : तानाजी घोडके

परंडा( फारुक शेख)दिव्यांग उद्योगसमूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय परंडा मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की 3 डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या हा दिन सर्व ग्रामपंचायत शासकीय कार्यालय या ठिकाणी विविध कार्यक्रम घेऊन आयोजित करावे जेणेकरून दिव्यांग व्यक्तीच्या अधिकाराची व त्यांना त्यांच्या कायद्याची जनजागृती होईल आणि त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना सन्मानाची वागणूक मिळेल या निवेदनाच्या गांभीर्यपूर्वक विचार करून तात्काळ सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात यावे अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे ज्या कार्यालयात व ग्रामपंचायत मध्ये दिव्यांग दिन साजरा होणार नाही अशा ठिकाणी दिव्यांग बांधवांच्या वतीने शोले स्टाईलने आंदोलन केले जाईल याची संबंधित अधिकारी यांनी आपल्या अधिनस्त सर्व कार्यालयांना कळवावे अशी मागणी दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने करण्यात येत आहे या निवेदनावर दिव्यांग उद्योग समूहाचे अध्यक्ष जिल्हाप्रमुख तानाजी घोडके शहराध्यक्ष गोरख देशमाने तानाजी सांगडे आदिवासी विकास तालुका अध्यक्ष सतीश पवार अशोक भराडे, संतोष कुलकर्णी, वसुदेव मोटे अर्शद काझी, मोहम्मद तुटके, हनुमंत राऊत,गणेश जाधव दादा माने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.