सामाजिक

राप.महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी जनसेवा करून आपल्या विभागाची प्रतिष्ठा वाढवावी.! -राजाभाऊ सोनकांबळे

 

सोलापूर ( रमेश सुरवसे )महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागामधील तसेच इतर आगारांतील सेवेत असलेले चालक वाहक कर्मचारी व विविध तांत्रिक पदावर व प्रशासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्यातील कलागुणांचे कौशल्य दाखवित कर्तव्य भावनेतुन राप. महामंडळाच्या लाल परीने तसेच विविध राप.परिवहनच्या इतर बसने प्रवास करणाऱ्या जनतेची कर्तव्याच्या जबाबदारीने प्रामाणिकपणे सेवा करीत राप.महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नामध्ये मोठया प्रमाणात भर करून राप.महामंडळाच्या सोलापूर विभागीय कार्यालयाचे राज्यभरात नांव लौकिक करून एक गुणवंत कामगार आणि आदर्श विभाग निर्माण करून दाखवावे.असे आवाहन कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे सोलापूरचे विभागीय सरचिटणीस राजाभाऊ सोनकांबळे यांनी केले.राप.महामंडळातील कामगारांना गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलेल्या कामगारांचे कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या सोलापूर जिल्ह्याच्या वतीने विभागीय सरचिटणीस राजाभाऊ सोनकांबळे यांनी भररून कौतुक करत अभिनंदन केले.*राप.महामंडळाच्या सोलापूर विभागीय कार्यालयाने आज दि.15 ऑगस्ट 2024 रोजी भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूरचे विभागीय वाहतूक अधिकारी अजय पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.त्यानंतर विभागीय*
*वाहतूक अधिकारी अजय पाटील यांच्या हस्ते राप.महामंडळातील गुणवंत कर्मचाऱ्यांना गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करत प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य मार्ग परिवहन महामंडळातील राज्य शासनाच्या मान्यता प्राप्त संघटना म्हणुन मान्यता असलेल्या कांही कामगार संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते.यावेळी शासनाच्या मान्यता प्राप्त असलेल्या कामगार संघटनेच्या कांही प्रमुख पदाधिकाऱ्यांचाही राप.महामंडळाच्या वतीने वाहतुक अधिकारी अजय पाटील यांनी पुष्पगुछ देऊन सत्कार केला.यावेळी राप.महामंडळातील अनेक वरिष्ठ कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button