सामाजिक
रिपाइं आठवले गटाच्या वतीने पोलिस हवलदार वाळके यांचे सत्कार

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट उत्तर पोलिस स्टेशनचे कर्मचारी प्रविण वाळके साहेब यांनी अक्कलकोट उत्तर पोलिस ठाणे मध्ये गेल्या सहा वर्षांपासून अतिशय चांगली कामगिरी करुन येथील कालावधी पूर्ण झाल्याने त्यांची शासकीय बदली सोलापूर येथे अनैतिक मानवी वाहतूक शाखा येथे झाल्याने रिपाइं आठवले गटाच्या वतीने सत्कार करण्यात आले यावेळी रिपाइं तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे, माळी महासंघ अक्कलकोट तालुका अध्यक्ष अप्पू (संतोष) पराणे, रिपाइं अक्कलकोट तालुका कोशाध्यक्ष अंबादास गायकवाड,पोलिस अधिकारी राजू राठोड,अजय साखरे,बुडून तांबोळी, वसंत चव्हाण,आदी उपस्थित होते.