वासरी येथील कांजाळकर पीडित कुटुंबीयांना दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने ५१ हजाराची आर्थिक मदत

गावकऱ्यांनी मानले दादाराव पाटील ढगे यांचे आभार
नांदेड ( हमीदखान पठाण )भोकर विधानसभेतील मुदखेड अर्धापूर, भोकर या तिन्ही तालुक्यातील पीडित कुटुंबांना सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने ५१- ५१ हजार ची आर्थिक मदत करण्यात आली.
मागील दोन दिवसापूर्वी मुदखेड तालुक्यातील मौजे वासरी येथील मयत संभाजी शिवाजी पाटील कांजाळकर या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे निधन झाले असल्याने. वासरी येथील शिवसेना तालुकाप्रमुख पिंटू पाटील वासरीकर यांनी दादाराव पाटील ढगे यांना या घटनेची माहिती दिली असता दादाराव पाटील ढगे यांनी दि.५ ऑगस्ट २०२४ रोजी वासरी येथे जाऊन कांजाळकर पिढीत कुटुंबीयांचे सांत्वन भेट घेऊन ५१ हजाराची आर्थिक मदत करण्यात आली.
याप्रसंगी वासरी येथील गावकऱ्यांनी आपली भावना व्यक्त करताना म्हणाले या भागातील नेते अशोक चव्हाण यांनी आपल्याच मतदार संघातील असलेल्या वासरी येथील कांजाळकर पीडित कुटुंबियाची सांत्वन भेट देखील घेतली नसल्याने गावकऱ्यांच्या वतीने
अशोक चव्हाण यांच्या बद्दल खंत व्यक्त केली जात आहे.
परंतु या भागातील सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांनी मात्र या घटनेची माहिती मिळताच क्षणाचाही विचार न करता पीडित कुटुंबीयांना सामाजिक भावनेतून आर्थिक मदत करत असल्याची भावना देखील गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक यांची उपस्थिती होती.