सामाजिक
श्री कुरण महालक्ष्मी थंडी यात्रा भक्तीभावाने संपन्न

अक्कलकोट ( प्रतिनिधी )- अक्कलकोट-सोलापूर रोडवरील जुन्या कालीन श्री कुरण लक्ष्मी थंडी यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमाने, उत्सहात संपन्न झाली. अनेक दिग्गजांनी श्री चे दर्शन घेतले.
कुरण महालक्ष्मी वीरशैव लिंगायत गवळी समाज व गवळी व्यवसायिक समिती च्या वतीने आषाढी थंडी यात्रा दि.२६ जुलै रोजी शुक्रवार पहाटे सहा वाजता महालक्ष्मी अभिषेक व पूजा महाआरती करण्यात आले. त्यानंतर सुहासिनींचा अक्कलकोट शहरातून कलश पूजन मुरलीधर मंदिरापासून ते सोलापूर कुरण महालक्ष्मी मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आले. लक्ष्मीची उत्सव मूर्ती भव्य मिरवणूक माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. पूजा करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. सकाळी ११ वाजता सुरू झालेले मिरवणूक दुपारी ४ वाजेपर्यंत सुरुवात मिरवणूक सुरू होते. आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये म्हशी पळवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. सकाळी १० पासून संध्याकाळी सहा पर्यंत हजारो भाविकांनी महाप्रसादाचे लाभ घेतले. यावेळी कार्यक्रमासाठी अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, महेश हिडोंळे, बसवराज माशाळे, यशवंत धोंगडे, मिलन कल्याणशेट्टी, सुनील बंडगर, अविनाश मडीखांबे ,संतोष पराणे, योगेश पवार, शिवशरण वाले, नंनू कोरबू, लखन झपंले, अक्कलकोट शहरातील प्रतिष्ठित व्यापारी विविध संस्थेतील कर्मचारी अक्कलकोट शहरातील लक्ष्मी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रा. किसन झिपरे, संयोजक कांत झिपरे, संजय भास्कर, भीमा मलवे, दीपक साळुंखे, संजय भागानगरे, प्रशांत कटारे यांच्यासह गवळी समाजातील महिला व पुरुष शेकडो कार्येकर्ते परिश्रम घेतले.
यात्रेनिमित्त शेकडो म्हशी पळविण्यात आले. त्यामधून प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक काढून बक्षीस वितरण करण्यात आले. परंपरा कायम ठेवण्यात आले. पोतराज खेळ करण्यात आले. एक हजार भाविकांनी महाप्रसाद लाभ घेतला.
