सामाजिक

सय्यद दातापीर शाह कादरी दर्गा ऊर्स भक्तीभावाने साजरा

अक्कलकोट ( प्रतिनिधी )

अक्कलकोट शहराजवळील अक्कलकोट सोलापूर रोड जवळ असणाऱ्या आसताना सय्यद दातापीर शाह कादरी दर्गाचा 79 वा उरूस मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यात आला. यावेळी हजारो भाविकांनी सय्यद दातापर शाह कादरी दर्गा येथे दर्शनासाठी गर्दी केली होती. ऊर्स निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. 

सालाबदाप्रमाणे याही वर्षी आसताना सय्यद दातापीर शाह कादरी दर्ग्याचा 79 व्या ऊर्स निमित्त दिनांक 28 जुलै रोजी गंध संदल मिरवणूक अक्कलकोट शहरातून काढण्यात आली. दिनांक 29 जुलै रोजी चिराग दीपोत्सव साजरा करण्यात आला. दिनांक ३० जुलै रोजी ज्यारत असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी हजरत सय्यद शाह दातापीर शाह कादरी किबुला सज्जादा नशीन, हजरत सय्यद शाह मस्तूर शाह कादरी किबला सज्जादा नशीन, हजरत सय्यद शाह गौसपीर कादरी ,हजरत सय्यद शाह हुसेन पीर चिस्ती, हजरत सय्यद शाह सज्जाद हुसेनी (मानवी कर्नाटक ) हजरत सय्यद शाह तलहापीर कादरी ( (लावबाली कर्नाटक ) आदी धर्मगुरूंची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. ऊर्स निमित्त धार्मिक प्रवचन सोहळा पार पडला. देशात सुख समृद्धी शांती बंधुभाव नांदावे. सर्व प्राणिमात्रा सुखी व्हावे यासाठी प्रार्थना करण्यात आली. ऊर्स निमित्त दर्गात चार दिवस महाप्रसादाचे वाटप करण्यात आले .कर्नाटक महाराष्ट्र व विविध राज्यातून आलेल्या हजारो भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. विविध धार्मिक कार्यक्रमाने आसताना हजरत सय्यद शाह दातापीर शाह कादरी दर्गा उरूस भक्तिभावाने संपन्न झाला. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी अश्पाक बळोरगी , महबूब मुल्ला महेश हिंडोळे यशवंत धोंगडे फारुख बबर्ची काशिनाथ गोळे हुसेन बळुर्गी रजाक सय्यद आदीसह विविध मान्यवरांनी दर्शन घेतले. या ऊर्स निमित्त हाफिज फुरखान नक्शबंदी सत्तार बळोरगी सैपन चोपदार दाता बळोरगी रफिक पठाण मुर्तूज बाजे ताकीर दरेखा आदींसह विविध भाविकांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button