धार्मिक

हैद्रा देवस्थानचा सौरऊर्जा  प्रकल्प आता लोकसहभागातून

ट्रस्टने घेतला निर्णय
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) : लाखो भाविकांचे 
तसेच सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या ख्वाजा पीर सैफुलमुलक चिस्ती दर्गा हैद्रा देवस्थान येथे सुमारे १८ ते २० लाख 
रुपये खर्चाचा सौरऊर्जा प्रकल्प आता लोकसहभागातून उभारण्यात येणार 
आहे. यापूर्वी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे २० किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प देणगी स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबाबत दीड – दोन महिन्यापूर्वी हैद्रा देवस्थान ट्रस्टने संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे 
भोसले व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे 
भोसले यांच्याकडे पत्राद्वारे मागणी 
पण केली होती. मात्र,त्यांनी अद्याप पर्यंत 
हैद्रा देवस्थान ट्रस्टकडे कोणतीही रोख 
रक्कम किंवा धनादेश दिलेला नाही.
त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार करून 
आम्ही या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च सामाजिक बांधिलकीतून आणि लोकसहभागातुनच उचलण्याचे ठरविले आहे.लवकरच सौरऊर्जा प्रकल्पाचे काम पूर्ण करून लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष रफिक मुजावर यांनी पत्रकारांशी
 बोलताना दिली.
हैद्रा देवस्थान येथे सध्या घडीला दरमहा 
सुमारे ६० ते ७० हजार रुपयांचे वीजबिल 
येत असल्याने देवस्थानच्या व्यवस्थापनावर मोठा आर्थिक भार पडत आहे.आता सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर या वीजखर्चात मोठी बचत होणार असून बचत झालेला 
निधी देवस्थानच्या धार्मिक, सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांसाठी वापरणे शक्य होणार आहे.लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या 
या प्रकल्पासाठी आता भाविक, नागरिक तसेच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तींनीच पुढाकार घ्यावा, असा ट्रस्टचा प्रयत्न 
आहे,असे त्यांनी सांगितले.
आजही अक्कलकोट तालुक्यातील 
कोणतीही निवडणूक असो, नारळ फोडून शुभारंभ करण्याची परंपरा हैद्रा देवस्थानातून सुरू होते. जागृत देवस्थान म्हणून ते प्रसिद्ध आहे.भाविकांकडून मोठ्या प्रमाणात नवस फेडला जात असल्याने या देवस्थानाला 
विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.विविध धर्मांच्या भाविकांना जोडणारे हे श्रद्धास्थान म्हणूनही त्याची ओळख आहे. त्यामुळे 
आता लोकसहभागातून हा सौर ऊर्जा प्रकल्प साकारला जाणारा आहे.यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष बंदेनवाज मुजावर,सचिव वकील मुजावर, नागनहळळी आश्रम शाळेचे सचिव जावेद पटेल आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button