डॉ. माधवी रायते यांचा होणार अमृत महोत्सव

श्री सिद्धेश्वर फाउंडेशन करणार सोहळा
‘श्री सिद्धेश्वर सोलापूर भूषण’ पुरस्कार देऊन होणार गौरव
सोलापूर : विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या डॉ. माधवी वासुदेव रायते यांचा अमृत महोत्सवानिमित्त सत्कार समारंभ श्री सिद्धेश्वर फाउंडेशनकडून आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात ‘श्री सिद्धेश्वर सोलापूर भूषण पुरस्कार’ देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे सचिव डॉ. अनिल सर्जे यांनी दिली.
डॉ. माधवी रायते यांनी वैद्यकीय, संगीत, नाट्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, आध्यात्मिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रात मोठे कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन श्री सिद्धेश्वर फाउंडेशनकडून त्यांचा गौरव होणार आहे. रविवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी हा समारंभ संपन्न होणार आहे. ज्येष्ठ उद्योगपती बिपिनभाई पटेल यांच्या शुभहस्ते गौरव होणार असून अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधीज्ञ जे. जे. कुलकर्णी असणार आहेत. सकाळी दहा वाजता द्वारकाधीश मंदिर, जलाराम नगर, जुळे सोलापूर येथे हा समारंभ संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री सिद्धेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष सिद्धार्थ सर्जे, संगीत विभाग प्रमुख नितीन दिवाकर, डॉ. निरज रायते यांनी केले आहे.



